Malegaon Incident | तीन वर्षीय यज्ञा दुसाने मालेगाव अमानुष अत्याचाराची बळी | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातर्फे घटनेचा तीव्र निषेध
Pune News – (The Karbhari News Service) – मालेगाव येथील तीन वर्षे वयाची यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर एका नराधमाने विकृत पद्धतीने अमानुष अत्याचार करून तिची हत्या केली. या घटनेचा तीव्र निषेध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्षातर्फे करण्यात आला. (NCP – SCP Pune)
ही श्रद्धांजली सभा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या ग्रंथालय सेल शहर अध्यक्ष प्राजक्ता जाधव यांनी आयोजित केली होती. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला अध्यक्ष स्वाती पोकळे, गौरी कदम, सिनियर सिटीझन शहर अध्यक्ष दादा सांगळे, तेजस मिसाळ, उपस्थित होते. या प्रसंगी मेणबत्या प्रज्वलित करून, यज्ञा दुसाने हिला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पालक महिलांनी सतत मोबाईल, टीव्ही यावर गुंतून न रहाता मुलांच्या सुरक्षेची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. मुलांना संगत कोणाची आहे? मुलांची शारीरिक मानसिक वाढ व्यवस्थित होत आहे ना? या विषयांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुला-मुलींना सर्व बाबतीत समान वागणूक द्यायला हवी, असे प्राजक्ता जाधव यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
अशा घटनांमुळे संबंधितांचे आर्थिक, मानसिक नुकसान होते. या परिणामांचे भान ठेवायला पाहिजे, असे मत प्राजक्ता जाधव यांनी याप्रसंगी झालेल्या सभेत व्यक्त केले.

COMMENTS