अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री करा | राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदेलन
टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत,पोहचल्याने व त्यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द झाल्याने पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आक्रमक झाली आमदार अब्दुल सत्तार यांना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री करावे म्हणुन उपरोधक पध्दतीने आंदेलन करण्यात आले.
महीला प्रदेशाघ्यक्ष विद्या चव्हाण यांच्या नेतूत्वाखाली डेंगळे पुल येथे आंदोलन करण्यात आले . या प्रंसंगी बोलताना आ. चव्हाण म्हणाल्या ईडीच्या भीतीपोटी अनेक आमदार भाजपामध्ये सामील होत आहे. त्यामुळे हे सरकार गद्दाराचे आहे आणि गद्दारांकडून आणखी काय अपेक्षा असते ते आपल्याच घराचा उद्धार करणार, अशी टिका त्यांनी केली.
प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले आ.अब्दुल सत्तारांना भ्रष्टाचारी म्हणू नका कारण ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघालेले आहेत आणि ते अत्यंत कुटुंबवत्सल आहेत त्याप्रेमापोटी त्यांच्या मुलीं अपात्र असतानाही पात्र झाल्या आहेत आणि आपल्याच संस्थेवर त्यांनी त्यांना नोकरीही दिलेली असे महान शिक्षणतज्ञ जर या राज्याला शिक्षण मंत्री म्हणून लाभले तर या ईडी सरकारच्या शिरपेचात अजून ऐक मानाचा तुरा रोवला जाईल तसेच पुढील काळात अनेक नापास विधार्थी ही पास होतील व अपात्र विद्यार्थांना खुप मोठ्या संधी उपलब्ध होतील अशी अत्यंत बोचरी टीका प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी यावेळी केली.
सदर प्रसंगी आ. विद्या चव्हाण , प्रवक्ते प्रदीप देशमुख , वैशाली नागवडे ,मृणालिनी वाणी , विद्या ताकवले , दिलशाद अत्तार, लोचन शिवले ,शीला भालेराव, शारदा सोडी , उषा घोगरे, सारिका पारेख , वैजंती घोडके
राजेश्वरी पाटील व इतर महीला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या .