Majhi Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियानात पुणे महापालिका तिसऱ्या स्थानावर
| पहिला क्रमांक पिंपरी चिंचवडचा तर दुसरा नवी मुंबईचा
पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर, २०२० राबविण्यास सुरवात झाली. “माझी वसुंधरा अभियान ३.०” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १ एप्रिल, २०२२ ते दिनांक ३१ मार्च, २०२३ या कालावधीत राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये राज्यातील ४११ नागरी स्थानिक संस्था व १६,४१३ ग्राम पंचायती अशा एकूण १६,८२४ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. (world environment Day)
माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमापन त्रयस्त यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोनही मुल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियान ३.० मधील लोकासंख्यानिहाय ११ गटातील विजेते तसेच, महसूल विभाग व जिल्ह्याच्या एकूण कामगिरी वरून सर्वोत्तम विभागीय आयुक्त, सर्वोत्तम जिल्हाधिकारी व सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची शासनाच्या मान्यतेनंतर निवड
करण्यात आली आहे. याबाबतचा निकाल दिनांक ५ जून, २०२३ रोजी जाहिर करण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation News)
१० लक्ष पेक्षा अधिक लोकसंख्या गट :
1. पिंपरी चिंचवड महानगरपालिका
2. नवी मुंबई महानगरपालिका
3. पुणे महानगरपालिका