Savitribai Phule Pune University | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागा लढविणार

HomeपुणेBreaking News

Savitribai Phule Pune University | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागा लढविणार

Ganesh Kumar Mule Nov 08, 2022 1:40 PM

Mahavikas Aghadi | Maratha Samaj | मराठा समाजाच्या समर्थनार्थ महविकास आघाडीचे धरणे आंदोलन
DPDC Pune | जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात पक्षपात महाविकास आघाडी आक्रमक!
MVA | Shetkari Akrosh Morcha | महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ला उद्यापासून प्रारंभ |शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात शनिवारी सभा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागा लढविणार

पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूक प्रक्रियेसाठी महाविकास आघाडीने सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले असून महाविकास आघाडी ही निवडणूक पूर्ण ताकतीनीशी लढविणार आहे. अशी माहिती महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून सावित्रीबाई फुले विद्यापीठात एका विशिष्ट विचाराच्या लोकांची सत्ता आहे. विद्यापीठाचा कारभार लोकाभिमुख होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना मदत होणारी मदत केंद्र त्यांच्या सोयी सुविधा पुणे विद्यापीठासह नगर व नाशिक या केंद्रांवर विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय या सर्व बाबी लक्षात घेता महाविकास आघाडीने ही निवडणूक लढविण्याचे ठरवले असून , त्यानुसार या सर्व जागांवर त्यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत.

कोरोना महामारीच्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,युवासेना, एन. एस. यु.आय या विद्यार्थी संघटनांनी केलेली मदत. ऑफलाइन परीक्षा बाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय, कोविड काळात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, कोवीड काळात ज्या मुलांनी आपल्या पालकांना गमावले त्यांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकारी नोकर भरतीस आलेला वेग असे अनेक चांगले निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेले असल्याने पुणे विद्यापीठातील मतदान महाविकास आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे राहतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि हेच मुद्दे घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडी यास निवडणुकीत उतरली असून या पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे” , असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मांडले आहे.

या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रविकांत वर्पे ,सुनील गव्हाणे, गजानन थरकुडे, राजेश पळसकर, शरद लाड, प्रदीप देशमुख, किशोर कांबळे, मनोज पाचपुते यांसह पॅनलचे सर्व उमेदवार उपस्थित होते.