Mahavikas Aghadi on EVM | महाविकास आघाडीचा आक्रमक | पवित्रा लोकशाहीच्या हत्येचा तीव्र निषेध
Pune News – (The Karbhari News Service) – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातून धक्कादायक निकाल आले. राज्यातील अनेक मतदारसंघात सर्वसामान्य जनतेकडून EVM मशीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. (Mahavikas Aghadi Pune)
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार केली आहे. EVM मशीनच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या झाली अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष तथा महाविकास आघाडीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी मांडली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या, भारतीय संविधानाला सर्वोच्च मानणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला लोकशाहीचे हे अधःपतन सहन होणार नाही असं म्हणत महाविकास आघाडीने लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा पुकारत आज विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन केले.
यावेळी ज्येष्ठ नेते श्री. मोहनदादा जोशी, प्रशांत जगताप, न्या. बी.जी. कोळसे पाटील, श्री. रमेशदादा बागवे,श्री. विश्वंभर चौधरी, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, श्री. अजित अभ्यंकर, शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, अश्विनीताई कदम, दत्ताभाऊ बहिरट यांच्यासह अनेक मान्यवर व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS