MAHATET 2024 | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Homeadministrative

MAHATET 2024 | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Ganesh Kumar Mule Sep 19, 2024 7:39 PM

Vasundhara Day | वसुंधरा दिनानिमित्त साकारले अनोखे भरडधान्य-लक्ष्मी बीज चित्र | भरडधान्य संस्कृती जनमानसात रुजावी यासाठी विविध संस्थांचा प्रयत्न
PMC Recruitment Update News | महापालिकेत विविध पदांच्या भरतीसाठी 87 हजार 471 अर्ज दाखल 
7 th pay commission | 9 लाखांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाची भेट | डीएमध्ये 3 टक्के वाढ

MAHATET 2024 | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

MAHATET 2024 – (The Karbhari News Service) –  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (MAHATET 2024) साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना http://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या वरील वेबसाईटवर देण्यात आला आहे, असेही श्री. राठोड यांनी कळविले आहे.