Maharashtra Swarajya Party | मनीष आनंद आणि विजय डाकले यांना छत्रपती संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा पाठींबा

HomeBreaking News

Maharashtra Swarajya Party | मनीष आनंद आणि विजय डाकले यांना छत्रपती संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा पाठींबा

Ganesh Kumar Mule Nov 16, 2024 7:16 PM

Shasan Aapalya Dari | शासन आपल्या दारी कार्यक्रमात  पुणे जिल्ह्यातील २२ लाख नागरिकांना लाभ
Ramdas Athawale | तर पुण्याचे महापौरपद आऱपीआयला मिळावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी
Honeytrap DRDO Scientist | पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याने DRDO च्या शास्त्रज्ञाला अटक

Maharashtra Swarajya Party | मनीष आनंद आणि विजय डाकले यांना छत्रपती संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा पाठींबा

 

Pune Election News – (The Karbhari News Service) – पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार मनीष आनंद आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विजय डाकले यांना छत्रपती संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा अधिकृत पाठींबा जाहीर करण्यात आला आहे. पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी याबाबत माहिती दिली. (Vidhansabha Election 2024)

धनंजय जाधव म्हणाले की, “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हा लोकहिताच्या मुद्द्यांसाठी वचनबद्ध आहे. मनीष आनंद आणि विजय डाकले हे दोन्ही उमेदवार स्थानिक समस्यांना जाणून घेत सकारात्मक दृष्टिकोनाने काम करत आहेत. त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता होईल, असा विश्वास आम्हाला आहे. त्यामुळेच पक्षाने त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या उमेदवारांमुळे त्या-त्या मतदारसंघात सकारात्मक बदल होईल, असा आमचा विश्वास आहे.”

मनीष आनंद हे शिवाजीनगर मतदारसंघात प्रामुख्याने शैक्षणिक सुविधा, वाहतूक व्यवस्थापन आणि बेरोजगारीच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. तर विजय डाकले कोथरुड मतदारसंघात एसआरए प्रकल्प, महापालिका कामगारांचे प्रश्न आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर काम करत आहेत. स्वराज्य पक्षाच्या या निर्णयामुळे अपक्ष उमेदवारांना अधिक बळ मिळाले आहे.