Maharashtra Rain Update | आजपासून पुण्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा  | नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

HomeपुणेBreaking News

Maharashtra Rain Update | आजपासून पुण्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा | नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Ganesh Kumar Mule Jul 18, 2023 5:01 AM

Pune Rain Update | Heavy rain forecast in Pune tomorrow and the day after
Rain : IMD : राज्यात आगामी 3 दिवसात जोरदार पावसाची शक्यता!  : हवामान खात्याचा इशारा
Monsoon Update | हवामान विभागाचा अंदाज | येत्या ४,५ दिवसांत महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता
 Maharashtra Rain Update |  भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मंगळवार १८ जुलै २०२३ रोजी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच २१ जुलै २०२३ पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. (Maharashtra Rain Update)
या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ४५, तर काही ठिकाणी तो ताशी ५५ किलोमीटरपर्यंत जावू शकतो, अशीही शक्यता वर्तविली आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून मासेमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा इशारा दिल्यानंतर राज्य शासनाने संबंधित जिल्हा प्रशासनांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. (IMD)
००००
News Title | Maharashtra Rain Update | Heavy rain warning in Madhya Maharashtra including Pune from today | Citizens are urged to be vigilant