Maharashtra Assembly Election Counting | विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने कोरेगाव पार्क परिसरात वाहतुकीत बदल
Pune City Traffic Police – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी भारतीय खाद्य निगम (एफ.सी.आय. गोडाऊन) कोरेगाव पार्क येथे २३ नोव्हेंबर रोजी होणार असल्याने शासकीय अधिकारी, कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी व अन्य नागरिक यांची वाहने त्याठिकाणी येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये तसेच वाहतूक सुरळित व सुरक्षित राहण्याच्यादृष्टिने वाहतुकीत बदल करण्यात येत आहेत.
भारतीय खाद्य निगम (एफ.सी.आय. गोडावुन) कोरेगाव पार्क येथील मतमोजणी केंद्रासमोरील साऊथ मेन रोड वर पूर्वेस लेन नंबर ५ जक्शंन, पश्चिमेस लेन नंबर २ जक्शंनपर्यंत तसेच लेन नंबर ३ व लेन नंबर ४ वर २०० मीटरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग झोन करण्यात येत आहे.
डॉन बॉस्को युवा केद्रापासून पुढे साऊथ मेन रोडवरील वाहतूक २२ नोव्हेंबर रोजी रात्री २२.०० वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. सेंट मीरा कॉलेज व अतुरपार्क सोसायटी कडून साऊथ मेन रस्त्याकडे येणाऱ्या वाहनांना लेन नंबर १ पुढे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
लेन नंबर ५, ६ व ७ कडून साऊथ मेन रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना लेन नंबर ४ पुढे प्रवेश बंद राहील. या मार्गानी येणाऱ्या वाहनचालकांना उजवीकडे वळण घेऊन इच्छित स्थळी जाता येईल. लेन नंबर २ वर प्लॉट नंबर ३८ जैन प्रॉपर्टी येथे व लेन नंबर ३ वर बंगला नंबर ६७ व ६८ येथे साऊथ मेन रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
निवडणूक मतमोजणी अधिकारी, कर्मचारी व नागरिकांसाठी पार्किंग व्यवस्था
पुज्य कस्तुरबा गांधी शाळा नॉर्थ मेन रस्ता कोरेगाव पार्क येथे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या ६०० ते ७०० दुचाकीच्या पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आली आहे, रोही व्हिला लॉन्स लेन नंबर ७ कोरेगाव पार्क येथे नागरिकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था तर द पुना स्कूल ॲन्ड होम फॉर द ब्लाईड ट्रस्ट, नॉर्थ मेन रस्ता, कोरेगाव पार्क येथे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवेतील पोलीसांची, अग्निशामक, ॲम्ब्युलन्स तसेच निवडणूक अधिकारी यांच्या वाहनांना वगळून आवश्यकतेनुसार वरीलप्रमाणे प्रवेश बंदी तसेच नो- पार्किंग करण्यात येत असून नागरिकांनी वाहतुकीत केलेल्या बदलाची नोंद घ्यावी, असे पुणे शहर वाहतूक शाखेचे उप आयुक्त अमोल झेंडे यांनी कळविले आहे.
COMMENTS