Mahaparivartan Mahashakti | महापरिवर्तन महाशक्तीची दहा जागांची पहिली यादी जाहीर | संभाजी राजे छत्रपती, बच्चु कडू, राजू शेट्टी यांनी केली पहिली यादी जाहीर

HomeBreaking News

Mahaparivartan Mahashakti | महापरिवर्तन महाशक्तीची दहा जागांची पहिली यादी जाहीर | संभाजी राजे छत्रपती, बच्चु कडू, राजू शेट्टी यांनी केली पहिली यादी जाहीर

Ganesh Kumar Mule Oct 21, 2024 7:51 PM

Pune moves from 20th to 10th position in Swachh Survekshan’s All India Ranking  |  2nd rank in Maharashtra
Voting Percentage of Maharashtra Increased | महाराष्ट्राच्या मतदान टक्केवारीत वाढ!
Mahavikas Aghadi | भाजपामधील आयारामांना इंडिया आघाडीने उमेदवारी देऊ नये | सामाजिक कार्यकर्त्याचा इशारा

Mahaparivartan Mahashakti | महापरिवर्तन महाशक्तीची दहा जागांची पहिली यादी जाहीर | संभाजी राजे छत्रपती, बच्चु कडू, राजू शेट्टी यांनी केली पहिली यादी जाहीर

| पहिल्या यादीत एक आमदार दोन मा आमदार, बच्चु कडू, वामनराव चटप , सुभाष साबणे यांच्या नावाचा समावेश

 

Pune News – (The Karbhari News Service) –  महापरिवर्तन महाशक्तीच्या वतीनं आज पुण्यात राज्यातील दहा जागांची यादी जाहीर केली. या यादीत प्रहार जनशक्तीचे बच्चु कडू यांचा समावेश आहे.

पुण्यात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे छत्रपती, प्रहार जनशक्तीचे बच्चु कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत आपल्या यादीची घोषणा केली. यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव प्रहारचे अनिल चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, महाराष्ट्रात निवडणुकांचे वातावरण तापू लागलं आहे. आज महापरिवर्तन महाशक्तीची बैठक झाली. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.आमच्याकडे येणाऱ्या विस्थापितांची मोठी यादी आहे. पण प्रस्थापित देखील उमेदवारीसाठी मोठ्या संख्येने आम्हाला संपर्क करत आहेत.

बच्चु कडू म्हणाले की, इतर पक्षांसारख्या आम्ही वेगवेगळ्या यादी जाहीर करत नाहीत. आम्ही सर्वजण एकत्र येऊन यादी जाहीर करत आहोत. राजकीय संस्कृती लयाला गेली आहे. ती पुन्हा रुजवायची आहे. म्हणून एक सक्षम पर्याय म्हणून आम्ही एकत्रित आलो आहोत.

राजू शेट्टी म्हणाले की, बारामतीतही आम्ही उमेदवार देणार आहोत. शिरोळ आणि मिरज या दोन मतदार संघात इच्छुकांची संख्या जास्त असल्याने तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन नावे जाहीर केली जातील. स्वच्छ चारित्र्य, आणि स्वच्छ हात ही आमची उमेदवारी देण्याची अट आहे.

 

आघाडी आणि युती एकत्र राहू शकत नाही

महाविकास आघाडी काय किंवा महायुती काय दोन्ही कडे तिघे आहेत. आघाडी एकत्र राहू शकत नाही, आघाडीतला एक पक्ष लवकरच बाहेर पडेल. महायुती झाली असली तरी, कार्यकर्त्यांमध्ये मध्ये चांगला संदेश गेलेला नाही. युती मधील एक पक्ष लवकरच बाहेर पडेल.चार तारखेला मोठा स्फोट होईल, चार तारीख ही महाराष्ट्राला वेगळी दिशा देणारा दिवस असेल.

 

“परिवर्तन महाशक्ती” महाराष्ट्र राज्य विधानसभा २०२४ अधिकृत उमेदवारांची यादी

उमेदवाराचे नाव

ओमप्रकाश उर्फ बच्चू बा. कडू
मतदार संघ
४२ – अचलपूर
प्रहार जनशक्ती पक्ष

अनिल छबिलदास चौधरी
११ – रावेर यावल
प्रहार जनशक्ती पक्ष

गणेश रमेश निंबाळकर
११८ – चांदवड
प्रहार जनशक्ती पक्ष

सुभाष साबणे
९० – देगलूर बिलोली (SC)
प्रहार जनशक्ती पक्ष

अंकुश सखाराम कदम
१५० – ऐरोली
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

माधव दादाराव देवसरकर
८४ – हद‌गाव हिमायतनगर
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

गोविंदराव सयाजीराव भवर
९४ – हिंगोली
महाराष्ट्र राज्य समिती

वामनराव चटप
७० – राजुरा
स्वतंत्र भारत पक्ष

शिरोळ आणि मिरज या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्यात. पण त्यावर कोण उमेदवार असले हे राजू शेट्टी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन घेतली.

परिवर्तन महाशक्तीच्या निवडणूक समन्वय पदी धनंजय जाधव यांची निवड

पुणे : परिवर्तन महाशक्तीच्या विधानसभा निवडणूक सुकाणू समितीच्या बैठकीत समन्वयक म्हणून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे धनंजय जाधव, तर सहसमन्वयक प्रहार जनशक्तीचे गौरव जाधव तर स्वाभिमानी पक्षाचे योगेश पांडे या तिघांच्या नावाची निवडणूक समन्वयक म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0