Maha tender Portal | निविदा प्रक्रियेत अपात्र झालेल्या ठेकेदारांना अनामत रकमेसाठी महापालिकेत माराव्या लागतात चकरा !

HomeपुणेBreaking News

Maha tender Portal | निविदा प्रक्रियेत अपात्र झालेल्या ठेकेदारांना अनामत रकमेसाठी महापालिकेत माराव्या लागतात चकरा !

Ganesh Kumar Mule Sep 23, 2023 1:48 PM

PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेची मर्यादा 1 लाख 60 हजार करण्यास स्थायी समितीची मान्यता | मुख्य सभेसमोर प्रस्ताव
PMC Unique Pune Walk | पुणे महापालिकेचा पहिला “युनिक पुणे वॉक”
PMC Encroachment Action | नगर रोड, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय हद्द आणि गोयल गंगा रस्त्यावरील अतिक्रमणावर महापालिकेकडून जोरदार कारवाई

Maha tender Portal | निविदा प्रक्रियेत अपात्र झालेल्या ठेकेदारांना अनामत रकमेसाठी महापालिकेत माराव्या लागतात चकरा !

| विविध विभागाची उदासीनता | अतिरिक्त आयुक्तांनी खातेप्रमुखांचे टोचले कान

Maha tender Portal | महापालिकेच्या (PMC Pune) विविध विभागांनी 2019 ते 2023 या कालावधीतील निविदांची माहिती महाटेंडर पोर्टल (Mahatender portal) वर अद्ययावत केलेली नाही. परिणामी निविदा प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या ठेकेदारांची अनामत रक्कम (Contractor Deposit) त्यांच्या खात्यावर जमा होत नाही. त्यामुळे ठेकेदारांना वारंवार महापालिकेत चकरा माराव्या लागतात. यावरून अतिरिक्त आयुक्तांनी खातेप्रमुखांचे कान टोचले आहेत. तसेच पोर्टल वर निविदांची माहिती अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहेत. (Pune Municipal Corporation)

महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेमधील (Pune Municipal Corporation) विविध विभागांमार्फत विविध विकास कामे करण्याकरीता महाराष्ट्र शासनाचे महाटेंडर पोर्टलद्वारे निविदा राबविण्यात येते. निविदा संबंधी सर्व माहिती महाटेंडर पोर्टल वर ऑनलाईन व्यापारी लिफाफा उघडलेनंतर प्रसिद्ध केली जाते. निविदा प्रसिद्ध केल्यानंतर सन २०१९ ते २०२३ या मधील आर्थिक वर्षातील विविध विभागांच्या काही निविदांची माहिती / AOC महाटेंडर पोर्टल वर ऑनलाईन अद्यायावत केली जात नाही, असे निदर्शनास आले आहे. महाटेंडर पोर्टल द्वारे निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित कामाची वर्कऑर्डर (AOC) बाबतची कार्यवाही पोर्टल वर अद्यावत नसल्यामुळे पात्र निविदाधारकांच्या व्यतिरिक्त इतर निविदा झालेल्या बयाणा रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होत नाही. याबाबत अपात्र निविदाधारक वारंवार बयाणा रक्कम परत करणे बाबतची कार्यवाही वेळेत होत नसलेबाबत तक्रार करीत आहेत. (PMC Pune)

आदेशात पुढे म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाने प्रसिद्धी झालेल्या निविदांची प्रलंबित प्रकरणे, वर्कऑर्डर(AOC) पोर्टल वर अपलोड करणे किंवा रद्द निविदा, फेर निविदा केलेल्या निविदांची सद्यस्थिती पोर्टलवर अद्यायावत करणे आवश्यक आहे. याबाबत यापूर्वी सर्व खातेप्रमुख व निविदा लेखनिक यांना कळविण्यात आले होते. तथापी सदर काम वेळेवर होत नसल्याचे दिसून येत आहे. Award Of Contract ची कार्यवाही पोर्टलद्वारे केल्याशिवाय पात्र (L1) ठेकेदारांच्या वयाणा रक्कम पुणे महानगरपालिकेच्या कोप कार्यालयामध्ये जमा होऊ शकत नाही व उर्वरित सर्व ठेकेदारांच्या वयाणा रक्कम परत केल्या जाऊ शकत नाही याबाबत याची संपूर्ण जबाबदारी संबंधित खातेप्रमुख व निविदा लेखनिक यांची राहील. तसेच महाटेंडर पोर्टल वरील व्यापारी लिफाफा commercial Envelope) उघडल्यावर Award of Contract ( AOC) ची कार्यवाही सत्वर करून यशस्वी ठेकेदाराचे वयांणा रक्कम जमा करून उर्वरित सर्व ठेकेदारांच्या रक्कमा परत केल्या जातील या बाबत सर्व खातेप्रमुखांनी त्यांचे अधिनस्त सर्व निविदा लेखनिक यांना सूचना द्याव्यात. तसेच, संबंधित विभागाच्या / खात्याच्या सर्व खातेप्रमुख यांनी वरीलबावत संबंधित जबाबदार असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांची तत्काळ महाटेंडर पोर्टल वर निविदांची माहिती Award of Contract (AOC) अद्यायावत करून अवगत करण्याची जरूर ती तजवीज करावी. असे  आदेशात म्हटले आहे.
——