राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती ; मात्र राज काहीच न बोलण्याने चर्चांना उधाण
पुणे : जय श्रीराम, जय हनुमानच्या घोषणेने पुण्यातील खालकर चौक खालकर चौकातील हनुमान मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते आज हनुमान जयंती निमित्त (hanuman jayanti) मारुती मंदिरात साडे सातच्या सुमारास महाआरती पार पडली. यासाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र यावेळी राज ठाकरे काहीच न बोलण्याने चर्चांना उधाण आले आहे.
दुपारपासून मंदिर परिसरात ढोलताशा, झांज पथक सुरू होते. ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरेंचे स्वागत करण्यात आले. महाआरतीनंतर हनुमान चालिसा पठणही झाले. खालकर चौकात सगळीकडे हिंदूजननायक राज ठाकरे असे फलक लावले होते. त्या फलकावर मागे मारूती पुढे राज ठाकरे दिसत होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मशिदीवरील भोंग्यांवरून वाद सुरू आहे.
राज ठाकरे आंबा महोत्सवानंतर महाआरतीला जाणार होते पण अचानक त्यांच्या कार्यक्रमात बदल झाला होता. त्यानंतर राज ठाकरे सरळ महाआरतीसाठी खालकर चौकात आले होते आणि मारुती मंदिरात महाआरती पार पडली. यावेळी हनुमान चालिसा छापलेल्या लहान पुस्तिकांचे जनसमूदायाला वाटप ही करण्यात आले होते. खालकर चौकात मनसैनिकानी मोठी गर्दी केली होती.
COMMENTS