Narmada River Bus Accident | मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटना | बचाव कार्यावर स्वतः मुख्यमंत्री लक्ष ठेऊन

HomeपुणेBreaking News

Narmada River Bus Accident | मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटना | बचाव कार्यावर स्वतः मुख्यमंत्री लक्ष ठेऊन

Ganesh Kumar Mule Jul 18, 2022 8:55 AM

Pune Water Cut Update | पालखी मुक्कामाच्या काळात पुणे शहरातील सोमवारची पाणीकपात रद्द करा 
Aadhar Card | आधार कार्डचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी बायोमेट्रिक्स सहजपणे लॉक केले जाऊ शकतात | संपूर्ण प्रक्रिया येथे जाणून घ्या
Kashmir Pandit | Pune Shivsena | काश्मीर पंडितावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पुणे शिवसेनेच्या वतीने आंदोलन!

 मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटना | बचाव कार्यावर स्वतः मुख्यमंत्री लक्ष ठेऊन

| बचावलेल्या प्रवाशी व जखमींना तातडीने सर्व मदत मिळेल ती पाहण्याचे प्रशासनाला निर्देश

अपघातानंतर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा

मुंबई : मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेश मधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७२२२३१८० आणि ०२५७२२१७१९३ असा आहे

आज सकाळी इंदोर होऊन अमळनेर कडे निघालेली एसटी महामंडळाची बस मध्य प्रदेश मधील खलघाट आणि टिकरी यामधील नदी पुलावर नदीच्या पुलावरून नर्मदा नदीत कोसळण्याची घटना घडली आहे

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत