Lonavala Sky Walk Project | PMRDA | लोणावळ्या जवळ होणार स्काय वॉक प्रकल्प विकसित

HomeपुणेBreaking News

Lonavala Sky Walk Project | PMRDA | लोणावळ्या जवळ होणार स्काय वॉक प्रकल्प विकसित

कारभारी वृत्तसेवा Nov 28, 2023 1:36 PM

PMRDA signed MoU with South Korea Bilateral cooperation in Urban Development
PMRDA | अनधिकृत बांधकामाप्रकरणी नोंदवले गुन्हे| पीएमआरडीएकडून कारवाई : नोटीसचे अनुपालन न करणे भोवले
Dr Yogesh Mhase IAS PMRDA | यशस्वी कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांचा गौरव | शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतील तिसऱ्या स्थानाबद्दल मंत्रालयात द‍िला पुरस्कार

Lonavala Sky Walk Project | PMRDA | लोणावळ्या जवळ होणार स्काय वॉक प्रकल्प विकसित

 

Lonavala Sky Walk Project | PMRDA |मावळ विधानसभा मतदारसंघाचे (Maval Constituency) आमदार  सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांचे संकल्पनेतून लोणावळा परिसर पर्यटन क्षेत्र विकासासाठी लोणावळ्यापासून १५ किमी अंतरावरील प्रसिद्ध लायन्स व टायगर पॉईंट येथे स्काय वॉक विकसित करण्यात येणार आहे. अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाच्या (PMRDA Administration) वतीने देण्यात आली. (Lonavala Sky Walk Project | PMRDA)

मावळ तालुक्यातील वन विभागाच्या मौजे आतवन येथील राखीव वन गट नं. १६६ मधील ८ हेक्टर क्षेत्रात हा स्काय वॉक पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत विकसित केला जाणार असून त्यास्तही पर्यटन विकास विभागाकडून वित्त पुरवठा केला जाणार आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वित्त मात्री आदरणीय अजितदादा पवार यांचे अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम पीएमआरडीए ने हाती घेतले आहे.