Lokvishwas Pratishthan Special Students | लोकविश्वास प्रतिष्ठानच्या विशेष मुलांचा अद्भुत कलाविष्कार .. आणि पुणेकर झाले मंत्रमुग्ध..!

Homeपुणेsocial

Lokvishwas Pratishthan Special Students | लोकविश्वास प्रतिष्ठानच्या विशेष मुलांचा अद्भुत कलाविष्कार .. आणि पुणेकर झाले मंत्रमुग्ध..!

गणेश मुळे Feb 11, 2024 4:46 PM

AAP Pune | आम आदमी पक्षाचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
PM Awas Yojana | PM आवास योजना 2024 पर्यंत वाढवण्यास मंजुरी | 122 लाख लोकांना मिळणार घर  | सरकारचा मोठा निर्णय
Pandharpur Ashadhi Wari 2023 | पंढरपूर आषाढी यात्रेसाठी ५००० विशेष बसेस सोडणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Lokvishwas Pratishthan Special Students | लोकविश्वास प्रतिष्ठानच्या विशेष मुलांचा अद्भुत कलाविष्कार .. आणि पुणेकर झाले मंत्रमुग्ध..!

Lokvishwas Pratishthan Special Students |  पुणे | कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात (Yashwantrao Chavan Natyagruh Kothrud) रविवारी पुणेकर रसिकांना एक अनोखी पर्वणी अनुभवायला मिळाली. ताला सुरातले गीत रामायणाचे झंकार, राम भक्तीची अनुभूती, त्यामुळे बाबूजी आणि गदिमांची झालेली आठवण, दमदार नेपथ्य आणि एखाद्या कसलेल्या अभिनेत्यासारखे काळावेळाचे भान न ठेवता गीत रामायणावर महानाट्य (Geetramayan Mahamaya) सादर करत असेलली लोकविश्वास प्रतिष्ठानची विशेष मुले ..! प्रतिष्ठानच्या मुलांनी सादर केलेल्या या महानाट्याने पुणेकरांना मंत्रमुग्ध तर केलेच शिवाय कला सादरीकरणातली एक वेगळी अनुभूती देखील दिली. त्यामुळे पुणेकर रसिक या कलाविष्काराने तृप्त झाले नसतील तर नवलच..!

 लोकविश्वास प्रतिष्ठान या गोव्यातील संस्थेच्या दिव्यांग मुलांनी (Lokvishwas Pratishthans Divyang Students) पुणेकरांसाठी गीत रामायणावर आधारित महानाट्य सादर करण्याचे ठरवले होते. त्यानुसार या महानाट्याचा पहिला प्रयोग शुक्रवार ९ फेब्रुवारी रोजी सिम्बॉयसिस ईशान्य भवन कॅम्पस, सिम्बॉयसिस स्कूल, म्हाडा कॉलनी, विमान नगर, पुणे येथे झाला.  तर दुसरा प्रयोग रविवार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी कोथरूड पुणे येथील यशवंतराव चव्हाण नाटयगृहात (Yashwantrao Chavan Natyagruh Pune) पार पडला.  लोकविश्वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुप प्रियोळकर,  सचिव सविता देसाई (Savita Desai), प्राचार्य अरविंद मोरे (Arvind More Principal) आणि त्यांच्या इतर शिक्षक सहकाऱ्यांनी घेतलेल्या अथक मेहनतीने ही शानदार मैफल पुणेकरांना अनुभवायला मिळाली.

सन २०२० मध्ये बाबूजी व गदिमांची जन्मशताब्दी होती. त्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने लोकविश्वास प्रतिष्ठानच्या मुलांनी गोव्यात एका कार्यक्रमात गीतरामायणाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली होती. हा कार्यक्रम काही पुणेकरांनी बघितला होता, त्यावेळी त्यांनी हा कार्यक्रम पुण्यात व्हावा असा आग्रह धरला होता. पुणेकरांच्या आग्रहाखातर या महानाट्याचे प्रयोग पुण्यात आयोजित करण्यात आले होते. या महानाट्यात सुमारे दोनशे अंध, दिव्यांग विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी झाले होते. या दोन्ही कार्यक्रमास  पुणेकरांनी मोठा प्रतिसाद देऊन मुलांचा उत्साह चांगलाच वाढवला.