Lokmat Office to Savitri Garden Road | लोकमत कार्यालय ते सावित्री गार्डन रस्ता : 90% जागा ताब्यात | उर्वरित जागाही ताब्यात घेऊन रस्ता पूर्ण करणारच : अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे

HomeUncategorized

Lokmat Office to Savitri Garden Road | लोकमत कार्यालय ते सावित्री गार्डन रस्ता : 90% जागा ताब्यात | उर्वरित जागाही ताब्यात घेऊन रस्ता पूर्ण करणारच : अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे

गणेश मुळे Feb 17, 2024 3:20 PM

Dhayari Narhe Road | धायरी, नऱ्हे परिसरातील तीन मुख्य रस्त्यांचा होणार विकास! 
Dilip walse patil : सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
PMC Garbage Collection | धायरी, आंबेगाव, नऱ्हे परिसरात कचऱ्याचे कंटेनर नाहीत | खासदार सुप्रिया सुळे यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार

Lokmat Office to Savitri Garden Road | लोकमत कार्यालय ते सावित्री गार्डन रस्ता : 90% जागा ताब्यात | उर्वरित जागाही ताब्यात घेऊन रस्ता पूर्ण करणारच : अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे

Dhayari Narhe Road | पुणे | धायरी आणि नऱ्हे परिसरातील तीन मुख्य रस्त्यांचा विकास महापालिका पथ विभागाकडून (PMC Road Department) केला जाणार आहे. यातील लोकमत कार्यालय ते सावित्री गार्डन (Lokmat Office to Savitri Garden Road) पर्यंतच्या रस्त्यांच्या जागा ताबा घेण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावर महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी विश्वास दिला कि काही झाले तरी परिसराचा विकास करण्यासाठी हा रस्ता आम्ही पूर्ण करणार आहोत. 90% जागा आमच्या ताब्यात आहेत. उर्वरित जागाचा ताबा घेऊन रस्ता नियोजित वेळेत आम्ही पूर्ण करणार आहोत. (Pune Municipal Corporation Latest News)
धायरी आणि नऱ्हे परिसरात रस्त्यांचा विकास झालेला नाही. त्यामुळे या उपनगरांमध्ये वाहतूक कोंडी आढळून येते. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या परिसरातील रस्ते विकसित करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये 3 रस्त्यांचा समावेश आहे. (Pune PMC News)
यातील एक रस्ता लोकमत कार्यालय ते सावित्री गार्डन रस्ता हा असणार आहे. 30 मीटर रुंदीचा हा डीपी रस्ता केला जाणार आहे. याची लांबी सुमारे 1200 मीटर आहे. हा रस्ता करण्यासाठी मुख्य कॅनॉल आणि बेबी कॅनॉल पुलाचे देखील काम करावे लागणार आहे.
दरम्यान रस्ता विकसनात बाधा ठरणाऱ्या जागा महापालिकेच्या ताब्यात आहेत का, असा प्रश्न काही राजकीय नेते आणि परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला होता. याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि संबंधित परिसरातील जागा मालकासोबत आम्ही एकूण 6 वेळा बैठका घेतल्या आहेत. परिसराच्या विकासासाठी आणि इथल्या लोकांची वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी हा रस्ता करणे किती महत्वाचा आहे. हे आम्ही त्यांना पटवून दिले आहे. त्यानुसार जागा मालकांनी संयुक्त मोजणी करून देण्याची मागणी केली होती. ती मोजणी आम्ही पूर्ण केली आहे.
 खात्री झाल्यावर त्यातील 90% जागामालक जागा देण्यास तयार झाले आहेत. त्यानुसार आम्ही ताबा घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. शिवाय बाकी जे 10% लोक आहेत त्यांच्याकडून आम्ही जबरदस्तीने जागा ताब्यात घेणार आहोत. कारण लोकांना सुविधा देण्यासाठी आणि परिसराचा विकास होण्यासाठी हा रस्ता होणं महत्वाचा आहे. त्यानुसार नियोजित वेळेत म्हणजे 30 जुलै पर्यंत आम्ही हा रस्ता पूर्ण करणारच आहोत.