Lohgaon-Wagholi water project | लोहगावकरांचा पाणी प्रश्न अखेर सुटणार | 283 कोटींच्या पाणी योजनेला मंजुरी  | आमदार सुनिल टिंगरे यांची माहिती

HomeपुणेBreaking News

Lohgaon-Wagholi water project | लोहगावकरांचा पाणी प्रश्न अखेर सुटणार | 283 कोटींच्या पाणी योजनेला मंजुरी | आमदार सुनिल टिंगरे यांची माहिती

Ganesh Kumar Mule Apr 28, 2023 1:09 PM

PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेतील डायलिसिसचे दर वाढवले!| जुन्या समितीच्या शिफारशीनुसार दर निश्चित करावे
PMPML | BRTS | पीएमपीने  बीआरटी बसस्थानकामधील सुरक्षारक्षकांची नियुक्ती थांबवली  | आर्थिक कारणास्तव पीएमपीचा धोरणात्मक निर्णय 
PMC Employees Promotion – महापालिकेच्या चतुर्थश्रेणी संवर्गातील २९ कर्मचाऱ्यांना लिपिक टंकलेखक (वर्ग ३) पदावर पदोन्नत्ती

लोहगावकरांचा पाणी प्रश्न अखेर सुटणार | 283 कोटींच्या पाणी योजनेला मंजुरी

| आमदार सुनिल टिंगरे यांची माहिती

महापालिकेत (PMC Pune) समाविष्ट झाल्यानंतर जवळपास सहा वर्षांनतर लोहगावचा (Lohgaon) पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लोहगाव- वाघोली पाणी योजनेच्या (Lohgaon-Wagholi water project) तब्बल 283 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला महापालिकेच्या वित्त समितीच्या बैठकीत गुरुवारी मंजुरी देण्यात आली. वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre)  यांनी ही माहिती दिली.

ऑक्टोबर 2017 मध्ये लोहगावचा पालिकेत समावेश झाला. पालिकेत येऊन ही या गावाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटू शकला नव्हता. यासंदर्भात आमदार टिंगरे यांनी दोन आठवड्यापूर्वी महापालिका भवनासमोर उपोषण केले होते. त्यानंतर जाग्या झालेल्या प्रशासनाने लोहगावच्या पाणी पुरवठा योजनेसाठी लवकरच निविदा काढण्याचे आश्वासन आमदार टिंगरे यांना अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले होते. त्यानुसार गुरुवारी झालेल्या वित्तीय समितीच्या बैठकीत लोहगाव- वाघोली पाणी पुरवठ्याच्या 283 कोटीच्या योजनेला वित्तीय समितीत मंजुरी देण्यात आली. (Lohgaon-Wagholi water project)

या योजनेतून ६० एमएलडी इतका पाणी पुरवठा केला जाणार आहे. योजनेसाठी भामा आसखेड प्रकल्पातून पाणी उपलब्ध होणार आहे. भामा आसखेड योजनेतून महापालिकेला प्रति दिन २०० एमएलडी इतके पाणी मंजुर आहे. त्यापैकी सध्या १२० एमएलडी इतेकच पाणी महापालिका उचलत आहे. २०४१ ची या भागातील लोकसंख्या गृहीत धरून लोहगांव- वाघोली पाणी पुरवठा योजनेचा आराखडा तयार केला आहे. (MLA Sunil Tingre)