जशास तसे उत्तर देऊ ..! राज ठाकरेंच्या दोन मोठ्या घोषणा
पुणे – भोंगे हटाव ही मोहीम धार्मिक नाही तर सामाजिक आहे. देशातील न्यायव्यवस्थेपेक्षा धर्म मोठा वाटत असेल तर ३ तारखेपर्यंत भोंगे हटवले नाहीत तर जशास तसं उत्तर देऊ. महाराष्ट्रात आणि देशात कुठल्याही प्रकारची दंगल नको. शांतता भंग करण्याची गरज नाही. प्रार्थनेला कुणाचाही विरोध नाही. भोंगे हटणार नसतील तर आमच्याही आरत्या तुम्हाला ऐकायला लागतील असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा बुलंद केला आहे.
राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत २ महत्त्वाच्या घोषणा केल्या. येत्या १ मे रोजी संभाजीनगर येथे जाहीर सभा होणार आहे. तर ५ जून रोजी मनसे सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार आहे अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. मुस्लीम बांधवांनी हा विषय धर्मावर नेऊ नये. सामाजिक विषय आहे. भोंग्याच्या आवाजामुळे लहान मुले, विद्यार्थी यांनाही त्रास होतो. आमच्या मिरवणुकीवर तुम्ही दगडफेक करणार असाल तर आमचेही हात बांधले नाहीत असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. केवळ हिंदूनाच नव्हे तर मुस्लीमांनाही आवाजाचा त्रास होत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले आहे.
COMMENTS