PMC Election 2022 | Women Reservation | महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत उद्या  | महापालिका प्रशासनाकडून रंगीत तालीम; जय्यत तयारी 

HomeBreaking Newsपुणे

PMC Election 2022 | Women Reservation | महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत उद्या | महापालिका प्रशासनाकडून रंगीत तालीम; जय्यत तयारी 

Ganesh Kumar Mule May 30, 2022 1:43 PM

Dhol Tasha | MP Girish Bapat | Anurag Thakur | खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली ‘ही’ मागणी
E-Content Development Workshop | ओतूरच्या वाघिरे महाविद्यालयात ई-कंटेंट डेव्हलपमेंट कार्यशाळा संपन्न
Pensioner Alert |  ३० नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण न झाल्यास तुमची पेन्शन बंद होईल

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत उद्या

: महापालिका प्रशासनाकडून रंगीत तालीम; जय्यत तयारी

पुणे : आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत उद्या (ता. ३१) सकाळी ११ वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा मंच येथे काढली जाणार आहे. त्यांची रंगीत तालीम सोमवारी सायंकाळी महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. ही सोडत लॉटरी पद्धतीने होणार असून शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते ती काढण्यात येणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. अशी माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त यशवंत माने यांनी दिली.

महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाली आहे. ५८ प्रभागांत १७३ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यामध्ये २३ जागा अनुसूचित जाती तर दोन जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणूका होणार असल्याने सर्वसाधारण प्रवर्गासाठी जास्त जागा उपलब्ध झालेल्या आहेत. १७३ सदस्यांपैकी ८७ जागा या महिलांसाठी आरक्षीत आहेत. यामध्ये १२ अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमातीसाठी आरक्षण असतील. तर ७४ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिलांचे आरक्षण असणार आहे. तीन सदस्यांचा प्रभाग असल्याने २९ प्रभागांमध्ये दोन महिला असणार आहेत.

: असे असेल नियोजन

उपायुक्त माने यांच्या माहितीनुसार सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत कार्यक्रम सुरु होईल. त्यासाठी महापालिका कर्मचारी 9:30 पासूनच उपस्थित असतील. अनुसूचित जाती, जमाती व महिला आरक्षणासाठी चिठ्ठ्या तयार करणे, सोडतीचे व्हिडिओ चित्रीकरण करणे, सोडतीचे लाइव्ह प्रसारण करणे, स्टेजवर तसेच बाहेरील बाजूस एलईडी स्क्रीन बसविणार आहेत. या ठिकाणी कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन केले आहे.

दरम्यान आज सायंकाळी आरक्षण सोडतीची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, निवडणूक उपायुक्त यशवंत माने, सहायक आयुक्त आशिष महाडदळकर, सांख्यिकी व संगणक विभागाचे राहुल जगताप, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0