शिक्षण घेणे हा आनंदसोहळा वाटला पाहिजे | दत्तात्रेय वारे
भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्रि-प्रायमरी शाळेत नुकतेच आदर्श शिक्षक, वाबळेवाडी(ता. शिरूर जि. पुणे) येथीलजागतिक कीर्तीच्याशाळेचे शिल्पकार, राष्ट्रपती पारितोषिक विजेते, शिक्षण राज्यमंत्र्यांचे स्वीय, मा.श्री. दत्तात्रेय वारे सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
दत्तात्रय वारे सरांचे स्वागत ,शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नारायण हट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष: श्री. संदीप बेंडुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी: दिगंबर ढोकले {ज्येष्ठशिक्षण तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, प्रवचनकार) हे होते.
आदरणीय दत्तात्रेय वारे सर आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात म्हणाले,”नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेस जागतिक दर्जाची करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य मी स्वतः करेन! ते पुढे म्हणाले
“शिक्षण घेणे हा आनंदसोहळा वाटला पाहिजे, शाळेत येताना मुलांनी घाई केली पाहिजे व घरी जाताना ती रेंगाळली पाहिजेत , मुलांना खाजगी शिकवणी लावण्याची गरज पडायला नको, अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांवर उत्कृष्ट संस्कार व्हावेत व त्यातून शाळांच्या इमारतीत उद्याचा आदर्श नागरिक निर्माण व्हावा यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे शाळांनी लक्ष द्यावे, समाजाचे ही आपल्याबद्दल उत्तरदायित्व असल्यामुळे चांगल्या शाळा गावागावात निर्माण व्हावयास हव्यात!”
आपल्या एक तासाच्या व्याख्यानामध्ये स्वतःच्या कामाचे अनुभव सांगताना व शाळेविषयी दृष्टीकोण मांडताना त्यांनी पालकांना व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
यापूर्वी वाबळेवाडी, तालुका शिरूर येथे शाळेत केलेले उल्लेखनीय व अप्रतिम नेत्रदीपक काम व जागतिक कीर्ती पर्यंत शाळेचा पोचवलेला दर्जा, व सध्या कनेरसर ता. खेड जि. पुणे येथे कार्यरत असताना चालू असलेले काम , नाविन्यपूर्ण उपक्रमा विषयी सखोल माहिती व्याख्यानातून त्यांनी दिली.
नारायणहट शिक्षण संस्थेचे सचिव: प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले,”आदरणीय दत्तात्रेय वारे सरांच्या मार्गदर्शनाखाली नारायण हट शिक्षण संस्थेची आपली शाळा एक आदर्श व नामवंत शाळा बनवण्याचा प्रयत्न करून विद्यार्थी व समाज विकासाचे केंद्र करण्यात येईल”
कार्यक्रमाच्या अध्यक्ष: दिगंबर ढोकले सर आपले अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले” ” नारायण हट शिक्षण संस्थेची शाळा भोसरी परिसरात एक नामवंत शाळा म्हणून नक्की उदयास येईल असा आशावाद व्यक्त केला. व शाळेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या!”
या कार्यक्रमासाठी नारायण हट शिक्षण संस्थेचे संचालक, गृह संस्थेचे सभासद, परिसरातील नागरिक, पालक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन:अंकुशराव गोरडे, संदीप बेंडुरे, रोहिदास गैंद, मुकुंद राव आवटे, डॉ.वसंतराव गावडे, डॉ. बाळासाहेब माशेरे, शिवराम काळे, सौ. उज्वला थिटे, सौ. रोहिणी पवार, यांनी केले.
सूत्रसंचालन: सौ मीनल बागुल यांनी केले. आभार: सौ. सायली संत यांनी मांनले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी: विजय चौगुले, सौ.प्रतिभा तांबे, श्री. प्रवीण भाकड, सुरेखाताई मुके, सौ.भाग्यश्री नगरकर यांनी विशेष प्रयत्न केले.