कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत 5 एप्रिलला कामगार युनियनचा मोर्चा
पुणे महापालिकेत कार्यरत कंत्राटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका कामगार संघटनेकडून 5 एप्रिलला मोर्चा काढण्यात येणार आहे. संघटनेच्या वतीने ही माहिती देण्यात आली.
संघटनेच्या निवेदनानुसार युनियन नेहमीच कंत्राटी कामगारांचा प्रश्नांसाठी व्यापक व सर्वसमावेशक भूमिका मांडत असते. घोले रोड क्षेत्रीय कार्यालय, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय, नगररोड-वडगाव शेरी कार्यालय येथे सर्व कंत्राटी कामगारांना एकत्र करून कंत्राटी कामगारांची बैठक घेण्यात आली. ई.एस.आय. चे कार्ड, पी.एफ. जमा करणे बाबत, कामगारांचे किमान वेतन, घरभाडे,बोनस अश्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कंत्राटी कामगारांचा येत्या ५ एप्रिलला आपण प्रलंबित प्रश्नांकरिता मोर्चा काढणार आहोत त्याची कामगारांना माहिती देण्यात आली. कंत्राटी कामगारांची एकजूट व अन्याय विरोधात लढण्याची ताकदच कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देणार असल्याचा विश्वास कामगारांमध्ये जागृत करण्यात आला.