Kunal Kamra News | कुणाल कामराच्या वक्तव्याविरोधात पुणे शहर शिवसेना आक्रमक; पुण्यात दिसल्यास चोप देणार | शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

HomeBreaking News

Kunal Kamra News | कुणाल कामराच्या वक्तव्याविरोधात पुणे शहर शिवसेना आक्रमक; पुण्यात दिसल्यास चोप देणार | शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

Ganesh Kumar Mule Mar 24, 2025 1:44 PM

Local body Elections | पालिका निवडणुकांमध्ये मतदान केंद्रावर कर्मचारी नियुक्त करण्याबाबत निवडणूक आयोगाचे नवीन आदेश | जाणून घ्या सविस्तर
PMC New  Recruitment Rules | महापालिकेच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आता आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली | राज्य सरकारने पुणे महापालिके कडून सेवा प्रवेश नियम, आकृतिबंध बाबत मागितली माहिती
Air pollution in Pune | हवा प्रदूषण नियंत्रणासाठी 4 अधिकाऱ्यांचे पथक | सहाय्यक महापालिका आयुक्त यांचे राहणार नियंत्रण 

Kunal Kamra News | कुणाल कामराच्या वक्तव्याविरोधात पुणे शहर शिवसेना आक्रमक; पुण्यात दिसल्यास चोप देणार | शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

 

Shivsena Pune – (The Karbhari News Service) – कुणाल कामरा (Kunal Kamra) याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्यावर अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केलं असून या वक्तव्याचा पुणे शहराच्या वतीने तीव्र निषेध करतो. तसेच राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करणाऱ्या कामराचा आबारा का डाबरा करण्याचा कडक इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी दिला आहे. (Pune Shivsena News)!

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत वक्तव्य करून त्याच्या खालच्या पातळीचे वैचारिक दर्शन घडवले आहे. महाराष्ट्र ही छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे. या भूमीतील नेतृत्वाला, लोकप्रतिनिधींना अश्लाघ्य आणि हीन पातळीवर जाऊन हिणवण्याचा प्रकार हा अत्यंत निंदनीय असल्याचे शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले.

शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेले लोकप्रिय उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी अनेक संकटांना तोंड देत, राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी सतत कार्यरत राहण्याचा वसा घेतला आहे. अशा नेत्याविषयी जाहीरपणे विनोदाच्या नावावर अश्लाघ्य भाषेत केले गेलेले हीन पातळीचे विनोद हा केवळ शिंदे साहेबांचा नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे.

लोकशाहीमध्ये अभिव्यक्ति स्वातंत्र्याला मान आहे, मात्र त्याच्या मर्यादा ओलांडून अत्यंत हीन दर्जाची भाषा सुसंस्कृत महाराष्ट्राला कधीही न शोभणारी आहे, कुणाल कामराची ही भाषा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह्य नसून बेजबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा लोकप्रतिनिधींच्या प्रतिष्ठेचा आणि समाजाच्या भावनांचा अपमान होईल.

कुणाल कामरा याने आपली हीन पातळीची भाषा आणि अवमानकारक वक्तव्यांसाठी महाराष्ट्राच्या जनतेची आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा या कुणाल कामराचा आबरा का डाबरा करायला आम्हाला वेळ लागणार नाही. अशा कडक शब्दात पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी इशारा दिला. तसेच हा वाचाळवीर कुणाल कामरा पुणे शहरात दिसल्यास त्याला शिवसेना चोप दिल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.