Kojagiri Purnima 2025 | PMC Garden Department | कोजागिरी पौर्णिमे निमित्त महापालिकेची उद्याने रात्री 12 पर्यंत उघडी राहणार!   | सह महापलिका आयुक्त डॉ अशोक घोरपडे यांची माहिती

Homeadministrative

Kojagiri Purnima 2025 | PMC Garden Department | कोजागिरी पौर्णिमे निमित्त महापालिकेची उद्याने रात्री 12 पर्यंत उघडी राहणार! | सह महापलिका आयुक्त डॉ अशोक घोरपडे यांची माहिती

Ganesh Kumar Mule Oct 03, 2025 7:23 PM

Pu La Deshpande Udyan Pune | पु. ल. देशपांडे उद्यानात आजपासून महिला बचत गट खाद्य महोत्सव
PMC Garden Department | अवघ्या 5 रुपयात पुणे महापालिकेकडून घ्या स्थानिक जातीची रोपे
PMC 74th Anniversary | पुणे महापालिकेच्या 42 व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनाचे उदघाटन आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते संपन्न! 

Kojagiri Purnima 2025 | PMC Garden Department | कोजागिरी पौर्णिमे निमित्त महापालिकेची उद्याने रात्री 12 पर्यंत उघडी राहणार!

| सह महापलिका आयुक्त डॉ अशोक घोरपडे यांची माहिती

 

Kojagiri Purnima 2025 – (The Karbhari News Service) – “कोजागिरी पौर्णिमा” (Kojagiri Purnima) निमित्त पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीमधील उद्यानांच्या (PMC Garden) वेळेत वाढ करण्यात आली आहे. कोजागिरी पौर्णिमा” निमित्त पुणे महानगरपालिका हद्दीमधील उद्याने सकाळी ६.०० ते ११.०० व सायंकाळी ४.३० ते रात्री १२.०० वा. पर्यंत उघडी ठेवण्यात येणार आहेत. पुणे शहरातील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन महापालिकेचे सह महापलिका आयुक्त डॉ अशोक घोरपडे (Ashok Ghorpade PMC) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

घोरपडे यांच्या माहितीनुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ६६ (१०) अन्वये, सार्वजनिक उद्याने, बागा, मनोरंजनासाठी मोकळ्या जागांची तरतूद करणे, नागरिकांच्या मनोरंजनासाठी उद्याने /बागा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. पुणे महानगरपालिका अधिकारी क्षेत्रामध्ये एकूण १५ क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीअंतर्गत उद्यान विभागामार्फत एकूण २१६ उद्याने, मत्सालय व प्राणी संग्रहालय विकसित करण्यात आलेली आहे. सदर उद्यानांचे विकसन, सुशोभिकरण, देखभाल, देखरेख व दुरुस्ती विषयक कामे उद्यान विभागामार्फत करण्यात येतात. सदर उद्यानांमध्ये नागरिक, लहान मुले परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणवर भेट देत असतात. (PMC Pune)

यंदा ६ ऑक्टोबर म्हणजे सोमवार रोजी “कोजागिरी पौर्णिमा” असून, पुणे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उद्यानांमध्ये भेट देत असतात. सबब,  सालाबादप्रमाणे “कोजागिरी पौर्णिमा” निमित्त पुणे महानगरपालिका हद्दीमधील उद्याने सकाळी ६.०० ते ११.०० व सायंकाळी ४.३० ते रात्री १२.०० वा. उघडी ठेवण्यात येणार आहेत. पुणे शहरातील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन घोरपडे यांनी केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: