Khadakwasla Dam  | खडकवासला धरण ८५% टक्के क्षमतेने भरले!  पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता | कालव्यात न उतरण्याचे पाटबंधारे विभागाचे आवाहन

HomeBreaking Newsपुणे

Khadakwasla Dam | खडकवासला धरण ८५% टक्के क्षमतेने भरले! पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता | कालव्यात न उतरण्याचे पाटबंधारे विभागाचे आवाहन

गणेश मुळे Jul 23, 2024 6:17 AM

Khadakwasla Dam  | खडकवासला प्रकल्पातील ४ धरणे ७५ टक्के क्षमतेने भरली | ६ वाजल्या पासून खडकवासला मधून ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग 
Khadakwasla Dam Chain | उद्यापासून खडकवासला धरणांतून केला जाणार पाण्याचा विसर्ग | कालव्यात न उतरण्याचे पाटबंधारे विभागाचे आवाहन
Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांत सद्यस्थितीत 8.35 TMC पाणी | पुणेकरांना दिलासा | खडकवासला धरण 50% भरले

Khadakwasla Dam  | खडकवासला धरण ८५% टक्के क्षमतेने भरले!  पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता | कालव्यात न उतरण्याचे पाटबंधारे विभागाचे आवाहन

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update – पुणे शहर (Pune city) आणि खडकवासला धरण साखळी (Khadakwasla Chain Project) प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस (Pune Rain) सुरु आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान  खडकवासला धरण ८५% क्षमतेने भरले आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास नवीन मुठा उजवा कालवा मधून  पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे.  त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि कालव्यात कोणी उतरू नये. असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
आज  २३ जुलै रोजी  खडकवासला धरण ८५% टक्के क्षमतेने भरले आहे. पाऊस चालू/वाढत  राहिल्यास  परिस्थितीनुसार  खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रामध्ये पुढील २४ ते ४८तासात पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. तरी पुणे महानगर पालिका व पोलीस प्रशासन यांनी योग्य ती दक्षता घ्यावी. असे आदेश पाटबंधारे विभागाने जारी केले आहेत.
    तसेच सर्व नागरिकांना याद्वारे सतर्क करण्यात येते की कृपया नदी पात्रात कोणीही उतरू नये आणि पात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

खडकवासला प्रकल्पातील धरणे ५५% भरली

खडकवासला धरण साखळीतील 4 धरणांत सद्यस्थितीत १५.९७ टीएमसी म्हणजे ५४.७९%  इतके पाणी आहे. त्यापैकी खडकवासला धरणांत (Khadakwasla Dam) १.७० टीएमसी म्हणजे ८५%, पानशेत धरणांत (Panshet Dam) ६.६१ टीएमसी म्हणजे ६२.१०%, वरसगाव धरणांत (Varasgaon Dam) ६.१९% टीएमसी म्हणजे ४८.२९% तर टेमघर धरणांत (Temghar Dam) १.५८ टीएमसी म्हणजे ५२.५३%  इतके पाणी आहे. मागील वर्षी याच दिवसांत १५.१६ टीएमसी म्हणजे ५२% इतके पाणी चार धरणांत होते. (Pune Rain Update)
—-