Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांत मागील 2 दिवसांत वाढले 1 टीएमसी पाणी
| धरणांत सद्यस्थितीत 7.26 TMC पाणी
Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | पुणे शहर (Pune city) आणि खडकवासला धरण साखळी (Khadakwasla Chain Project) प्रकल्पात गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस (Pune Rain) सुरु आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या 2 दिवसांत धरणामध्ये 1 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. गुरुवारी हा साठा 6.24 टीएसमी होता. आज 5 वाजता हा साठा 7.26 टीएमसी झाला आहे. पुणेकरांना हा दिलासा मानला जात आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. (Khadakwasla Dam | Pune Rain Update)
मागील वर्षी याच दिवसांत चार धरणामध्ये 5.45 टीएमसी पाणी होते. यंदा मात्र पाणी जास्त आहे. तसेच पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान पुणे शहरात मे महिन्यापासून पाणी कपात (Pune Water Cut) करण्यात आली आहे. काही भागांत दर गुरुवारी तर काही भागात वेगवेगळ्या दिवशी पाणी बंद ठेवण्यात येते. त्यामुळे महापालिकेने पाण्याची बचत केली आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणी कमी होत चालले होते. मात्र आता पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. (Pune water cut update)
4 धरणांत 24.89% इतके पाणी
खडकवासला धरण साखळीतील 4 धरणांत सद्यस्थितीत 7.26 टीएमसी म्हणजे 24.89% इतके पाणी आहे. त्यापैकी खडकवासला धरणांत (Khadakwasla Dam) 0.99 टीएमसी म्हणजे 49.97%, पानशेत धरणांत (Panshet Dam) 2.64 टीएमसी म्हणजे 24.80%, वरसगाव धरणांत (Varasgaon Dam) 3.19 टीएमसी म्हणजे 24.87% तर टेमघर धरणांत (Temghar Dam) 0.44 टीएमसी म्हणजे 11.88% इतके पाणी आहे. मागील वर्षी याच दिवसांत 5.45 टीएमसी म्हणजे 18.68% इतके पाणी चार धरणांत होते. (Pune Rain Update)
—-
News Title | Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | 1 TMC water has increased in last 2 days in 4 dams of Khadakwasla project