Khadakwasla Dam | खडकवासला प्रकल्पातील ४ धरणे ५४ टक्के क्षमतेने भरली | धरणात १५.७४ टीएमसी पाणी

Homeadministrative

Khadakwasla Dam | खडकवासला प्रकल्पातील ४ धरणे ५४ टक्के क्षमतेने भरली | धरणात १५.७४ टीएमसी पाणी

Ganesh Kumar Mule Jul 02, 2025 9:10 PM

Pune PMC News | जीएसटी च्या अनुदानातून जलसंपदा विभागाची थकबाकी वळती करून घेतली जाणार | पुणे महापालिकेवर 187 कोटींचा आणखी एक बोजा
Heavy Rain in pune | बाहेर पडताना काळजी  घ्या | खडकवासला धरणातून 30 हजार क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग
Water Crisis in pune | पुणेकरांवर पाणीसंकट | चालू आठवड्यापासूनच एक दिवसाआड पाणी! 

Khadakwasla Dam | खडकवासला प्रकल्पातील ४ धरणे ५४ टक्के क्षमतेने भरली | धरणात १५.७४ टीएमसी पाणी

| खडकवासला मधून आतापर्यंत २.८८ टीएमसी पाण्याचा विसर्ग

 

Khadakwasla Dam Chain – (The Karbhari News Service) – पुणे शहर (Pune city) आणि खडकवासला धरण साखळी (Khadakwasla Chain Project) प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस (Pune Rain) सुरु आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान खडकवासला प्रकल्पातील पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी ४ धरणे ५४% क्षमतेने भरली आहेत. मागील वर्षी याच दिवशी चार धरणात अवघे ४.३५ टीएमसी पाणी म्हणजे १४.९२% पाणी होते. (Pune Rain News)

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आतापर्यंत २.८८ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

खडकवासला धरण साखळीतील 4 धरणांत सद्यस्थितीत १५.७४ टीएमसी म्हणजे ५४% इतके पाणी आहे. त्यापैकी खडकवासला धरणांत (Khadakwasla Dam) १.२८ टीएमसी म्हणजे ६४.७५%, पानशेत धरणांत (Panshet Dam) ५.४७ टीएमसी म्हणजे ५१.३७% वरसगाव धरणांत (Varasgaon Dam) ७.४६ टीएमसी म्हणजे ५८.१७% तर टेमघर धरणांत (Temghar Dam) १.५४ टीएमसी म्हणजे ५१.४८% इतके पाणी आहे. मागील वर्षी याच दिवसांत ४.३५ टीएमसी म्हणजे १५ इतके पाणी चार धरणांत होते. (Pune Rain Update)

तर जून महिन्यापासून आतापर्यंत खडकवासला धरणातून २.८८ टीएमसी पाणी मुठा आणि मुळा नदीच्या माध्यमातून कालव्यात सोडण्यात आले आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.
—-

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0