Katraj Zoo Online Ticket | राजीव गांधी प्राणिसंग्रहालय | 10 दिवसांत 10 हजार लोकांनी ऑनलाईन तिकीट सेवेचा घेतला लाभ
| महापालिकेला 3 लाखांहून अधिक उत्पन्न
Katraj Zoo Online Ticket | पुणे | महापालिकेचे राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्र (Rajiv Gandhi Zoological Park and Wildlife Research Center) अर्थात कात्रज झू पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यामुळे कधी कधी नागरिकांना तिकिटासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. हे टाळण्यासाठी पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) प्राणी संग्रहालयासाठी स्वतंत्र पोर्टल (Katraj Zoo Portal) सुरु केले आहे. या माध्यमातून नागरिक आता घरबसल्या ऑनलाईन तिकीट काढू शकतात. या प्रणालीचा लोकांना चांगला फायदा होतोय. गेल्या 10 दिवसांत जवळपास 10 हजार लोकांनी या प्रणालीचा फायदा घेतला आहे. यातून महापालिकेला 3 लाखाहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. अशी माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ राजकुमार जाधव यांनी दिली. (Director Dr Rajkumar Jadhav) यांनी दिली.
कात्रज परिसरात पुणे महापालिकेच्या (PMC Pune) वतीने राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्र निर्माण केले आहे. वाघ, सिंह, चित्ता, कोल्हा पासून ते सर्व प्रकारचे पक्षी, प्राणी, साप या संग्रहालयात आपल्याला पाहायला मिळतात. हे पाहण्यासाठी महाराष्ट्र भरातून लोक येत असतात. यात शाळांच्या सहलीचे प्रमाण देखील असते. शनिवार, रविवार किंवा इतर सुट्टीच्या दिवशी झू मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. जवळपास 10 हजार नागरिक एका दिवशी भेट देतात. वर्षभरात 17 ते 18 लाख पर्यटक भेट देत असतात. यातून पालिकेला 6 कोटी पर्यंत उत्पन्न मिळते. महापालिकेने तिकिटाचे काउंटर देखील वाढवले होते. तरीही नागरिकांना तिकिटासाठी बराच काळ रांगेत उभे राहावे लागते. याबाबत तक्रारी देखील येत होत्या. त्यामुळे याबाबत प्रशासनाने पुढाकार घेत तिकीटाची प्रणाली ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्वतंत्र पोर्टल चे काम पूर्ण करण्यात आले असून त्याचे नुकतेच उदघाटन झाले.
दरम्यान ही प्रणाली ऑनलाईन झाली असली तरी तिकिटाचे दर मात्र पाहिल्यासारखेच असणार आहेत. त्यात कुठलाही बदल नाही. प्रौढ व्यक्तींना 40 रुपये, मुलांना 10 रुपये, परदेशी नागरिकांना 100 रुपये असे तिकिटाचे दर आहेत. तर video कॅमेरा साठी 200 आणि स्टील कॅमेरा साठी 50 रुपये असा दर आहे. कोरोना नंतर महापालिकेला 8 कोटीचे उत्पन्न मिळाले होते.
ऑनलाईन प्रणालीचे काम Stark Digital Media Services Pvt. Ltd या कंपनीकडून करण्यात आले आहे. या प्रणालीचा गेल्या 10 दिवसांत 10 हजार लोकांनी लाभ घेतला आहे. असे डॉ जाधव यांनी सांगितले.
—-
ऑनलाईन प्रणालीमुळे नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत. पूर्वी नागरिकांचा रांगेत वेळ जात होता, तो वेळ आता वाचणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आता या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
– डॉ राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय.
—