Katraj-Kondhwa Road Pune |  कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामांसाठी अजित पवार २०० कोटी मिळवून देणार का? | अजित पवारांनी पाहणीच्या वेळी दिले आश्वासन 

HomeBreaking Newsपुणे

Katraj-Kondhwa Road Pune |  कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामांसाठी अजित पवार २०० कोटी मिळवून देणार का? | अजित पवारांनी पाहणीच्या वेळी दिले आश्वासन 

गणेश मुळे Jan 19, 2024 3:47 PM

Taljai Forest Park : तळजाई वन उद्यानात विविध विकासकामांचे उद्घाटन
Ekata Nagar Pune | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून एकता नगर परिसराची पाहणी | नुकसानीचे पंचनामे करून पूरबाधित नागरिकांना महानगरपालिका आणि शासनातर्फे सहकार्य करणार
Pune Traffic | Ajit Pawar | पुणे शहरातील वाहतूकविषयक समस्या सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या तज्ज्ञ प्रतिनिधींची समिती तयार करा |  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Katraj-Kondhwa Road Pune |  कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामांसाठी अजित पवार २०० कोटी मिळवून देणार का? | अजित पवारांनी पाहणीच्या वेळी दिले आश्वासन

 

Katraj-Kondhwa Road Pune | पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अचानकपणे कात्रज-कोंढवा रस्त्याच्या (Katraj – Kondhwa Road) कामांची पाहणी केली. त्यांनी रस्त्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. या कामासाठी राज्य शासनातर्फे २०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) विषय मांडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान गेले वर्षभर २०० कोटी देण्याबाबत राज्य सरकार महापालिकेला नुसते आश्वासन देत आहे. किमान अजित पवार तरी याबाबत मनावर घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Katraj-Kondhwa Road Pune | PMC)

पुणे शहराच्या दृष्टीने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण (Katraj- Kondhwa Road Widening) होणे महत्वाचे आहे. मात्र भूसंपादन (Land Acquisition) अभावी हे काम रखडले होते. भूसंपादन करण्यासाठी 200 कोटींचा निधी देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) आश्वस्त केले होते. मात्र प्रत्यक्षात निधी मिळालेला नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी नगर विकास विभागाला एका महिन्यात दोनदा पत्रव्यवहार करत 200 कोटी देण्याची मागणी केली होती.  पहिले पत्र 6 जुलै ला पाठवण्यात आले होते. तर  19 जुलै ला अजून एक पत्र पाठवण्यात आले होते. तरीहि निधी अजून मिळालेला नाही. (Katraj-Kondhwa Road)

The karbhari - Katraj kondhwa Road Fund

दरम्यान या पाहणीच्या वेळी अजित पवार म्हणाले, कात्रज चौक उड्डाणपूल ६५०-७०० मीटर पुढे वाढवावा. खडी मशीन चौकापासून पुढे सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता रुंदीकरण करण्यात यावे. खडी मशीन चौकापासून कान्हा हॅाटेलकडे येणारा एकतर्फी मार्ग तात्काळ चालू करायचे निर्देश त्यांनी दिले. रस्त्यासाठी जमीन ताबा देणाऱ्यांना त्यांनी व्यक्तीश: धन्यवाद दिले.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी रस्त्याच्या कामाविषयी माहिती दिली. उपमुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला या कामाबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार चेतन तुपे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महेश पाटील आदी उपस्थित होते.

परिसरातील नागरिकांच्यावतीने उपमुख्यमंत्री श्री.पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार रस्त्याच्या एक बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.