Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी 200 कोटी देण्याची महापालिकेची सरकारकडे मागणी
| महापालिकेने राज्य सरकारला पाठवले पत्र
Katraj-Kondhwa Road | पुणे शहराच्या दृष्टीने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण (Katraj- Kondhwa Road Widening) होणे महत्वाचे आहे. मात्र भूसंपादन (Land Acquisition) अभावी हे काम रखडले आहे. भूसंपादन करण्यासाठी 200 कोटींचा निधी देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) आश्वस्त केले होते. मात्र प्रत्यक्षात निधी मिळालेला नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी नगर विकास विभागाला पत्र पाठवत 200 कोटी देण्याची मागणी केली आहे. (Katraj-Kondhwa Road)
– उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासन
कात्रज कोंढवा रोड हा खूपच रहदारीचा रस्ता आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेकडून रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पूर्वी हा रस्ता 84 मीटर करण्याचे नियोजन होते. मात्र फक्त भूसंपादन साठी 556 कोटी रुपये लागणार होते. मात्र एवढी मोठी रक्कम असल्याने पुन्हा हा रस्ता 50 मीटर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 280 कोटी रुपये भूसंपादन साठी लागणार आहेत. (PMC Pune News)
यासाठी 200 कोटींचे अनुदान राज्य सरकार देणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ऑक्टोबर 2022 मध्ये बैठक झाली होती. फडणवीस यांनीच तसे आश्वासन दिले होते. मात्र सरकारने अजूनपर्यंत काही मदत केलेली नाही. त्यामुळे रस्त्याचे काम पुढे जाताना दिसत नाही. त्यामुळे महापालिकेकडून सरकारसोबत पत्र व्यवहार करण्यात आला आहे. दरम्यान चालू आर्थिक वर्षात आयुक्तांनी या रस्त्यासाठी 17 कोटींची तरतूद केली आहे. (Pune Municipal Corporation News)
——
News Title | Katraj-Kondhwa Road | Municipal Corporation’s request to the government to pay 200 crores for land acquisition of Katraj-Kondhwa road