Kasba Constituency | BJP | कसबा मतदारसंघातील मोफत आरोग्य तपासणी शिबिरात पहिल्याच दिवशी शंभर पेक्षा जास्त महिलांचा सहभाग
| कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या यांच्या पुढाकाराने महिलांना दिलासा
Kasba Constituency | BJP |पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (PM Narendra Modi Birthday) उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) व समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निवडणूक प्रमुख हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या संकल्पनेतून कसबा मतदारसंघात (Kasba Constituency) महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे (Helath Check Up Camp for women) आयोजन करण्यात आले आहे. १० ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून आज प्रभाग क्रमांक १८ मध्ये पहिल्याच दिवशी शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच ज्या नागरिकांना पुढील उपचाराची गरज आहे, त्यांनाही मदत केली जाणार आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), राज्य उपाध्यक्ष राजेश पांडे (Rajesh Pande) आणि शहराध्यक्ष धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वय वर्ष ४० वर्षांवरील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणात आले आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात महिला घरगुती कामांसोबतच त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी माझ्या माता – भगिनींसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या तपासणीमध्ये महिलांना काही आजार आढळल्यास त्यावर योग्य ते औषधोपचार करण्यात येतील.
समर्थ युवा फाऊंडेशनच्या माध्यमातून शिबीर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराच्या माध्यमातून आज प्रभाग १७ मधील शुक्रवार पेठेतील जैनमंदिर येथे फिरत्या आरोग्य तपासणी वाहिकेच्या माध्यमातून अनेक महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली व आरोग्या संबंधीच्या तक्रारींवर योग्य ते उपचार घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात रक्तातील साखर तपासणी (ब्लड शुगर),रक्तदाब तपासणी (बी.पी.),छातीचा एक्स-रे,रक्त तपासणी (सीबीसी टेस्ट),कोलेस्ट्रॉल तपासणी,स्तनाचा कर्करोग तपासणी (मॅमोग्राफी) आदी ९५०० रुपये पर्यंतच्या तपासण्या करण्यात आल्या. कसबा मतदारसंघातील सर्व ६ प्रभागांमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कसबा विधानसभा अध्यक्ष श्री. राजेंद्र काकडे, सहसंयोजक श्री.अनिल बेलकर, फार्मासिस्ट, केमिस्ट तसेच कसबा मतदारसंघातील सर्व महिला पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.