Kasba Constituency | कसबा मतदारसंघात ‘मेरा बूथ सबसे सुंदर’ स्पर्धेची घोषणा

HomeBreaking News

Kasba Constituency | कसबा मतदारसंघात ‘मेरा बूथ सबसे सुंदर’ स्पर्धेची घोषणा

Ganesh Kumar Mule Jun 13, 2025 8:47 PM

100th Natya Sammelan | १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण
PMC Election | आगामी महानगरपालिकेच्या तयारी संदर्भात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची कोर कमिटीची बैठक संपन्न
Dilip Vede patil | दिलीप वेडेपाटील यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोपवली महत्वाची जबाबदारी! 

Kasba Constituency | कसबा मतदारसंघात ‘मेरा बूथ सबसे सुंदर’ स्पर्धेची घोषणा

 

Pune News – (The Karbhari News Service) – कसबा मतदारसंघात सुरु असलेल्या ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ अभियानाला आणखी बळ देण्यासाठी ‘मिशन १०० दिवस’ राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत ‘मेरा बूथ सबसे सुंदर’ ही बूथ-स्तरीय अनोखी स्पर्धा आयोजित केली जाणार असून, या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या मदतीने नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली. कसबा मतदारसंघातील २७२ बूथवर ही स्पर्धा घेण्यात येणार असून, प्रत्येक बूथवर स्वच्छता, जनसहभाग, सौंदर्यीकरण, कचरा व्यवस्थापन यासारख्या विविध निकषांवर आधारित मूल्यांकन होईल. यासोबतच आरोग्य कोटीतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी देखील स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. (MLA Hemant Rasane)

फेब्रुवारी महिन्यात ‘क्लीन सिटी इंदौर’च्या दौऱ्यानंतर सुरु करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कसबा मतदारसंघात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. या काळात ६१ पैकी ४९ क्रॉनिक कचरा स्पॉट बंद करण्यात आले असून, त्या ठिकाणी सौंदर्यीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आल्यामुळे रात्रपाळीतही नियमित झाडलोट आणि कचरा उचलण्याचे काम होत आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबत गेली पाच महिन्यांत १२ ते १५ लाख रुपयांहून अधिक दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती रासने यांनी दिली आहे.

मिशन १०० दिवसचा पहिला टप्पा १० जून रोजी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसापासून सुरु झाला असून २२ जुलै, मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसापर्यंत हा टप्पा चालेल.दुसरा टप्पा २२ जुलै ते १७ सप्टेंबर, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापर्यंत राबवण्यात येणार आहे. या अभियानाचा औपचारिक शुभारंभ १५ जून रोजी, शनिवार पेठेतील अहिल्यादेवी कन्या शाळेजवळ आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे. यावेळी महापालिका आयुक्त श्री नवल किशोर राम, सिने अभिनेते प्रवीण तरडे, कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे, कॉसमॉस बँकेचे व्यवस्थापकीय अध्यक्ष मिलिंद काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

याबद्दल बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले, “स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, तर आपल्या प्रत्येकाची बांधिलकी आहे. ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ हे स्वप्न असून त्यासाठी ‘मेरा बूथ सबसे सुंदर’ स्पर्धेसारख्या उपक्रमांद्वारे जनतेचा थेट सहभाग वाढवला जाणार आहे. बूथ पातळीवर होणाऱ्या या स्पर्धेमुळे प्रत्येक कार्यकर्ता आणि नागरिक आपल्या परिसराची जबाबदारी घेईल, हीच या अभियानामागची प्रेरणा आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून आपला मतदारसंघ आदर्श ठरेल, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत”.