Karnataka Election Results | कर्नाटकमधील कॉंग्रेसचा विजय ही २०२४ मधील केंद्रातील सत्तापालटाची नांदी | मोहन जोशी
Karnataka Election Results | कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Election) कॉंग्रेस पक्षाने (congress Party) निर्विवाद बहुमत संपादन केले ही २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील सत्तापालटाची नांदी आहे. केंद्रातील अपयशी मोदी सरकार आणि कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे भ्रष्टाचारी व अकार्यक्षम सरकार यांविरुद्चा एकत्रित रोष कर्नाटकातील मतदारांनी मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त केला हे या निकालावरून दिसून येते. असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी केले. (Karnataka Election Results)
जोशी म्हणाले, जनतेच्या खऱ्या प्रश्नांच्या कडे दुर्लक्ष करीत केवळ धार्मिक उन्माद वाढविण्यावर भा ज पा ने भर दिला .धनसंपत्तीचा मोठा वापर केला.?मात्र , महागाई ,बेरोजगारी या बरोबरच महाभयानक भ्रष्टाचार याला विटलेला कर्नाटकातील मतदार या धार्मिक उन्मादाला बळी पडला नाही. भ्रष्ट्राचारी जनविरोधी ,सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून दूर फेकले, त्याबद्दल कर्नाटकच्या जनतेला मी धन्यवाद देतो. त्या बरोबरच यु पी ए अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी ,कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ,श्री.राहुल गांधी ,प्रियांका गांधी सर्व पदाधिकारी आणि कर्नाटक राज्यातील कॉंग्रेस नेते व कार्यकर्ते यांचे अभिनंदन करतो .
अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीने या निवडणुकीत चिकोडी लोकसभा मतदार संघातील आठ विधानसभा मतदार संघांची जबाबदारी निरीक्षक म्हणून माझ्यावर सोपवली होती.गेले 2 महिने अधिकाधिक वेळ मी त्यासाठी दिला .या मतदार संघात आठ पैकी पाच मतदारसंघात कॉंग्रेस पक्ष विजयी झाला याबद्दल चिकोडी लोकसभा मतदार संघातील मतदारांचे मी विशेष आभार मानतो.
‘ऑपरेशन लोटस’चा विचारही भाजपा करू शकणार नाही .एव्ह्ढे घवघवीत यश कर्नाटकातील मतदरांनी कॉंग्रेसला दिले आहे .कॉंग्रेस पक्ष हा विश्वास सार्थ ठरवेल हे निश्चित !असे ही जोशी म्हणाले.
——
——
Karnataka Election Results | Congress victory in Karnataka heralds a coup at the Center in 2024 Mohan Joshi