Kalicharan Baba | कालीचरण बाबाच्या वक्तव्यावरून  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक!

HomeBreaking Newsपुणे

Kalicharan Baba | कालीचरण बाबाच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक!

गणेश मुळे May 31, 2024 8:23 AM

PMC Vs TATA Projects | महापालिकेची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली | टाटाच्या उज्वल कंपनीला महापालिकेला द्यावे लागणार व्याजासहित पैसे
Property Tax | पुणेकरांना शिंदे फडणवीस सरकारचा दिलासा | ४० टक्के मिळकतकराची सवलत कायम राहणार | येत्या कॅबिनेट मीटींग मध्ये प्रस्ताव आणून मान्यता देणार
Sugar Production | साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा

Kalicharan Baba | कालीचरण बाबाच्या वक्तव्यावरून  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक!

Kalicharan Baba – (The Karbhari News Service) – कालिचरण बाबा यांनी महिलाना उद्देशून केलेल्या वक्तव्याने राजकारण चांगलेच तापले. बाबांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला असून पक्षाच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आले. (NCP – Sharadchandra Pawar)
याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि, स्वतःला धार्मिक गुरू म्हणवणारा भोंदू बाबा कालीचरण याने आपल्या माता भगिनींना केवळ उपभोग्य वस्तू असे उद्देशून तमाम महिलांचा अपमान केला आहे. “जगातील तमाम सुंदर महिलांचा उपभोग घ्या” हे या भोंदू बाबाचे वक्तव्य राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात होणं अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात असा विकृतपणा खपवून घेतला जात नाही. म्हणूनच या कालीचरणचा धिक्कार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

यावेळी  “पुरोगामी महाराष्ट्र हवा, कालीचरणला पळवून लावा”, “समाजाला धोका, कालीचरणला ठोका” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
अभिनव कला महाविद्यालय चौक, टिळक रस्ता येथे करण्यात आलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष श्री. प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात किशोर कांबळे, गणेश नलावडे, सारिका पारेख, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, तनया साळुंके, पायल चव्हाण, श्रधा जाधव, ऋतुजा देशमुख, मनीषा भोसले, दीपक जगताप, नितीन जाधव, ज्योतीताई सूर्यवंशी आदि पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.