Kalagram Pune P L Deshpande Garden | पुणेकरांना अनुभवता येणार जपानी संस्कृती, परंपरा | पु ल देशपांडे कलाग्राम मध्ये होणार कार्यक्रम
P L Deshpande Garden Pune – (The Karbhari News Service) – भारत आणि जपान यांच्यातील दृढ मैत्रीचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी इंडो जपान बिजनेस कौन्सिल (IJBC) च्या वतीने 16 आणि 17 नोव्हेंबर रोजी ‘कोन्निचीवा पुणे” हा दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.जपानी संस्कृतीचे सौंदर्य आणि परंपरा यांचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. (Pune Kalagram News)
इंडो जपान बिजनेस कौन्सिलचे अध्यक्ष सिद्धार्थ देशमुख आणि असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपानचे अध्यक्ष अँड समीर खळे यांनीही माहिती दिली.सिंहगड रस्त्यावरील पु ल देशपांडे कलाग्राम (पुणे ओकायामा फ्रेंडशिप गार्डन) येथे दुपारी तीन ते सायंकाळी आठ या वेळे हा कार्यक्रम होणार आहे.
जपान वाणिज्य दूतावास आणि कोन्निचीवा पुणे २०२४, असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपान यांच्या सहाय्याने हा महोत्सव होणार आहे .
या महोत्सवातपारंपारिक जपानी कला चहा-समारंभ, इकेबाना, निदान बुयो (पारंपारिक नृत्यविष्कार) फुरोशिकी (फॅब्रिक फोल्डिंगची कला) हे पाहता येणार आहे.आधुनिक पॉप कल्चर शोकेस- कॉसले परेड, विविध स्पर्धा, ॲनिमे सॉंग्स कराओके, हाय एनर्जी जपानी रॅपिड हे ही पाहता येणार आहे. यावेळी परस्पर संवादी कार्यशाळा जपानी कॅलिग्राफी (शोदो) जपानी बुद्धिबळ (शोगी), ओरिगामी, प्राचीन बोर्ड गेम्स होणार आहे. जपानी सांस्कृतिक प्रदर्शन, परंपरा, कला आणि नवकल्पना यांचा संगम दर्शवणाऱ्या अविष्काराचा अनुभव घेता येणार आहे.
२०१८ मध्ये स्थापन झालेल्या कोन्निचीवा पुणे हे सांस्कृतिक देवाण-घेवाणीसाठी प्रमुख व्यासपीठ बनले आहे . त्यामुळेच भारत आणि जपान यांमधील संबंध अजूनच दृढ होणार आहे.२०२४ चा हा सांस्कृतिक कार्यक्रमात भाषेच्या विद्यार्थ्यांपासून ते कुटुंबातील प्रत्येकासाठी जपानी संस्कृतीचे बहुआयामी सौंदर्य अनुभवण्याची ही पर्वणीच असणार आहे.
COMMENTS