सिंहगड रोडवर कलाग्राम देखील वर्षभरात होणार विकसित
पुणे महापालिकेकडून नाट्यगृह प्रमाणेच सिंहगड रोडवर वर्षभरात कलाग्राम (kalagram) विकसित करण्यात येणार आहे. पु ल देशपांडे उद्यानात कलाग्राम विकसित करण्यात येणार आहे. यात 600 आसनव्यवस्थेचे ऍम्पिथिएटर व 60 गाड्यांचे ड्राइव्ह इन थिएटर बांधण्यात येणार आहे. (PMC Pune)
महानगरपालिकेने शहरात 200 हून अधिक उद्याने (Garden) बांधली आहेत. यामध्ये पी.एल. देशपांडे गार्डनचाही समावेश आहे. वेगवेगळ्या टप्प्यांतर्गत या उद्यानाचे काम सुरू आहे. जपानी गार्डन पहिल्या टप्प्यात बांधण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मुघल गार्डन बांधण्यात आले आहे. आता तिसऱ्या टप्प्यात येथे कलाग्राम विकसित करण्यात येणार आहे. या कलाग्राम अंतर्गत विविध राज्यांतील कलांचे आविष्कार येथे दाखविण्यात येणार आहेत. जेणेकरून बाहेरील राज्यातील कलाकारांनाही येथे काम करण्याची संधी मिळेल. त्यानुसार हे काम करण्याची जबाबदारी स्मार्ट सिटीवर सोपविण्यात आली होती. मात्र स्मार्ट सिटीकडून या कामात दिरंगाई करण्यात आली. त्यामुळे काही लोकप्रतिनिधींनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे महापालिकेनेच याचे काम करावे असे ठरले. त्यानुसार महापालिका हे काम करणार आहे. (Pune Municipal Corporation)
—
महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात 8 कोटीची तरतूद कलाग्राम साठी केली आहे. आगामी वर्षभरात याचे काम पूर्ण करण्यात येईल.
– हर्षदा शिंदे, विभाग प्रमुख, भवन रचना