Jitendra Dudi IAS | पुणे जिल्हाधिकारी पदी जितेंद्र डूडी रुजू

Homeadministrative

Jitendra Dudi IAS | पुणे जिल्हाधिकारी पदी जितेंद्र डूडी रुजू

Ganesh Kumar Mule Jan 02, 2025 10:20 PM

Pune School Closed | पुणे शहर आणि परिसरातील शाळांना उद्या देखील सुट्टी | जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी जारी केले आदेश
to close two pubs in Pune city |  Orders of Collector Dr. Suhas Diwase
Vidhansabha Election Code of Conduct | आदर्श आचारसंहितेच्या पहिल्या ४८ तासात सार्वजनिक मालमत्तेवरील २५ हजाराहून अधिक प्रचारसाहित्य हटविले-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Jitendra Dudi IAS | पुणे जिल्हाधिकारी पदी जितेंद्र डूडी रुजू

 

Pune Collector – (The Karbhari News Service) – पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डूडी (JItendra Dudi IAS)  यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवला. (Pune News)

जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी यापूर्वी सन २०१९ मध्ये सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा, नंदूरबार, सन २०१९ ते २०२० या कालावधीत सहायक जिल्हाधिकारी मंचर तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव, पुणे तर सांगली जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सातारा जिल्हाधिकारी या पदावर काम केले आहे.

डूडी यांच्या सेवा कालावधीत पोषण अभियानातंर्गत ५ व्या राष्ट्रीय पोषण महिन्यात अधिकाधिक उपक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यात तृतीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रीय मतदान दिन २०२४ च्यावेळी पुणे विभागात उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून प्रथम पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.