PMC Standing Committee | जपानमधून आजची स्थायी समिती | कचरा, पाणी आणि आरोग्यसेवा तातडीने सुरळीत करण्याचे आदेश

जपान दौऱ्यावरून ऑनलाइन स्थायी समितीच्या बैठकीत पुण्यातील कचरा, पाणीपुरवठा आणि आरोग्यसेवेचा आढावा

Homeadministrative

PMC Standing Committee | जपानमधून आजची स्थायी समिती | कचरा, पाणी आणि आरोग्यसेवा तातडीने सुरळीत करण्याचे आदेश

Ganesh Kumar Mule Oct 01, 2026 9:10 PM

Suggestion : Objection : Ward Structure : प्रभाग रचनेवर आतापर्यंत 17 हरकती दाखल 
Health Checkup Camp : Rupali Dhadve : PMC : आता 8 मार्च ला दरवर्षी महिलांसाठी महापालिकेकडून आरोग्य तपासणी शिबीर 
New Member of Standing Committee : PMC : स्थायी  समितीच्या  नवीन  8  सदस्यांची  निवड  सोमवारी!   : खास  सभेत  होणार  निवड 

PMC Standing Committee | जपानमधून आजची स्थायी समिती | कचरा, पाणी आणि आरोग्यसेवा तातडीने सुरळीत करण्याचे आदेश

| विविध भागांतील तक्रारींची श्रीनाथ भिमाले यांनी घेतली दखल; प्रशासनाला तातडीने कार्यवाहीच्या सूचना

Shrinath Bhimale – (The Karbhari News Service) – शहरातील विविध भागांतील अस्वच्छता, साचलेला कचरा, विस्कळीत पाणीपुरवठा, दूषित पाणी तसेच आरोग्यसेवेशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींची स्थायी समितीच्या बैठकीत दखल घेण्यात आली. नागरिकांना मूलभूत सेवा-सुविधांसाठी त्रास होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाला दिल्या. (Pune Municipal Corporation – PMC)

महापालिकेत गुरुवारी (दि. १) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील विविध भागांतील समस्यांवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, महापौर मंजूषा नागपूरे, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर आणि शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर हे जपान दौऱ्यावरून बैठकीत ऑनलाइन सहभागी झाले.

वानवडी, जांभूळवाडी, वाघोली आणि कात्रज परिसरात नियमित स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या. काही ठिकाणी कचरा साचत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी या तक्रारींची तातडीने दखल घेऊन स्वच्छता व्यवस्था सुरळीत करावी, अशा सूचना देण्यात आल्या.दूषित पाण्याच्या तक्रारींची गंभीर दखलशहरातील काही भागांत पाणीपुरवठा नियमित होत नसल्याच्या तक्रारीही बैठकीत मांडण्यात आल्या.

काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यात दूषित पाणी मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित भागातील पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करून तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले.दरम्यान, वारंवार खंडित होणाऱ्या विद्युतपुरवठ्याचा परिणाम पाणीपुरवठा व्यवस्थेवर होत असल्याचेही बैठकीत निदर्शनास आले.

काही भागांतील पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरता येत नसल्याने नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत.याबाबत विद्युत विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेतील व्हॉल्व्हमनना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

ताप, डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांकडे लक्ष

बदलत्या हवामानामुळे ताप, थंडी, अंगदुखी, डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू, सर्दी-खोकला आदी आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये आवश्यक व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, तसेच संबंधित आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. औषधांचा तुटवडा होणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.

“नागरिकांना आवश्यक सेवा-सुविधांसाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. शहरातील कचरा, पाणीपुरवठा आणि आरोग्यसेवेशी संबंधित तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत,” असे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

बैठकीला समितीचे अन्य सदस्य आणि महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. जपान दौऱ्यावर असलेल्या महापौरांसह वरिष्ठ अधिकारी आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांनी ऑनलाइन सहभाग घेत शहरातील अत्यावश्यक सेवा-सुविधांचा आढावा घेतला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: