Janata Vasahat TDR | जनता वसाहत TDR प्रमाणे बीडीपी बाबत देखील निर्णय घ्या | माजी नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

Homeadministrative

Janata Vasahat TDR | जनता वसाहत TDR प्रमाणे बीडीपी बाबत देखील निर्णय घ्या | माजी नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

Ganesh Kumar Mule Aug 12, 2025 9:22 PM

Safai Karmchari | सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करा – शेरसिंग डागोर
PMC Officers | वारंवार बदली होऊनही काही अधिकाऱ्यांना पुणे महापालिकेचा ‘मोह’ सुटेना | ‘आर्थिक’ राजधानीत सगळी ‘प्रतिभा’ पणाला लावून महत्वाची खाती मिळण्याची “आशा”!
PMC Chief Auditor | अखेर पुणे महापालिकेचा मिळाला पूर्ण वेळ मुख्य लेखापरीक्षक!

Janata Vasahat TDR | जनता वसाहत TDR प्रमाणे बीडीपी बाबत देखील निर्णय घ्या | माजी नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

Pune BDP – (The Karbhari News Service) – जनता वसाहत पुणे पुनर्विकासासाठी १०० टक्के टीडीआर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र असाच निर्णय बीडीपी बाबत देखील होणे आवश्यक आहे. अशी मागणी माजी नगरसेवक उज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.  (Pune News)

माजी नगरसेवकांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदना नुसार आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो आणि पुण्यात असणाऱ्या बीडीपी आरक्षणासाठी देखील हा नियम लागू करावा अशी मागणी करतो. शंभर टक्के जागा जेव्हा आपण घेतो तेव्हा त्यांना न्याय देणे हे आपले कर्तव्य आहे हेच आम्ही अनेक वर्ष सांगतो आहे. बीडीपी आरक्षण हे गेले अनेक वर्ष आहे त्या स्थितीत आहे कारण त्याचा इंडेक्स हा शासनाने आठ टक्के ठरवला आहे त्यामुळे जागा मालक जागा देण्यास तयार नाही. या पार्श्वभूमीवर जनता वसाहत पुनर्विकासासाठी जर आपण डोंगर माथा उतार या जागेवर 100% टीडीआर देणारा असाल तर तसाच निर्णय बीडीपी बाबत होणे आवश्यक आहे आणि हा टीडीआर ग्रीन टी डी आर म्हणून दोन टक्के सक्तीने वापरण्याबाबत यू डीसीपीआर मध्ये बदल करावा. अशी मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: