Jalparni in Jambhulwadi Lake | जांभूळवाडी तलावात पिस्तीया जातीची जलपर्णी!   | जलपर्णी काढताना महापालिका प्रशासनाला नैसर्गिक अडचणींचा करावा लागतोय सामना

HomeपुणेBreaking News

Jalparni in Jambhulwadi Lake | जांभूळवाडी तलावात पिस्तीया जातीची जलपर्णी! | जलपर्णी काढताना महापालिका प्रशासनाला नैसर्गिक अडचणींचा करावा लागतोय सामना

गणेश मुळे Jan 15, 2024 8:52 AM

  Pune residents have paid the entire property tax!  Then win a car, phone and laptop from Pune Municipal Corporation!
Dr Siddharth Dhende | संगमवाडी ते टिंगरेनगर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश
Town planning shceme | वडगावशेरीत होणार टीपी स्कीम! लवकरच इरादा जाहीर केला जाणार

Jalparni in Jambhulwadi Lake | जांभूळवाडी तलावात पिस्तीया जातीची जलपर्णी!

| जलपर्णी काढताना महापालिका प्रशासनाला नैसर्गिक अडचणींचा करावा लागतोय सामना

Jalparni in Jambhulwadi Lake | पुणे | जांभूळवाडी तलावात (Jambhulwadi) पिस्तीया जातीच्या जलपर्णीची (Pistiya type Jalparni) वाढ झाली आहे. ही जलपर्णी काढताना महापालिका (PMC Pune) प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. कारण जलपर्णी काढल्याबरोबर काही वेळातच नवीन जलपर्णी वाढत आहे. आणि याचे प्रमाण प्रचंड आहे. दरम्यान आता या नैसर्गिक अडचणीवर कशी मात करावी, असा प्रश्न प्रशासना समोर उभा राहिला आहे. (Jambhulwadi Lake Pune)
जांभूळवाडी तलाव येथील जलपर्णी (Pune Jambhulwadi Lake Jalparni) काढायचे  काम जोमाने चालू आहे. मागील वर्षी याबाबतची टेंडर प्रक्रिया जारी करण्यात आली होती. 84 लाखाचे हे टेंडर होते. जांभूळवाडी तलावातील जलपर्णी काढण्याचे काम गेल्या महिन्याभरापासून सुरु आहे. पुणे महानगरपालिका मार्फत दररोज 5बिगारी व तिन जेसीबी अशी यंत्रणा काम करत आहे. मात्र या तलावात पिस्तीया जातीची जलपर्णी असल्याचे प्राथमिक अंदाज असुन एका जलपर्णी पासून रात्रीत दहा ते वीस या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे जलपर्णी काढूनही ती जोमाने वाढताना दिसत आहे. (Pune Municipal Corporation News)
याबाबत तलावाची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी समक्ष पाहणी केली. त्यावेळी यातील नैसर्गिक आणि तांत्रिक अडचणी लक्षात आल्या. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार यंदा पावसाळ्यात पाऊस कमी झाल्याने तलावातील पाणी वाहिले नाही. किंवा डोंगर उतारावरून तलावात पाणी जमा झाले नाही. हे पाणी फक्त मैलापाणी आहे. त्यामुळे तलावातील पाण्यात ऑक्सिजन चे प्रमाण देखील कमी झाले आहे. मात्र या नकारात्मक गोष्टीच जलपर्णी साठी सकारात्मक असतात. अशा वातावरणात जलपर्णी वेगाने वाढते. त्यामुळेच नेहमी जलपर्णी काढली तरी तिची वाढ होताना दिसून येत आहे. त्यासाठी तलावात जाणाऱ्या मैलापाण्यावर नियंत्रण आणावे लागणार आहे. तसेच जलपर्णी काढल्यानांतर मासे सोडावे लागणार आहेत. तेव्हा तलावाचा परिसर पर्यावरणीय दृष्ट्या सुधारण्यास मदत होणार आहे.
—-
जांभूळवाडी तलावात पिस्तीया जातीची जलपर्णी वेगाने वाढताना दिसून येत आहे. ही जलपर्णी उभी न वाढत पसरत जाते.  जलपर्णी काढण्याचे काम आम्ही करतोय. मात्र अजून जास्त मशीन लावून जलपर्णी काढण्याचे काम करावे लागणार आहे. जलपर्णी वाढण्याच्या वेगापेक्षा जास्त वेगाने काम करून जलपर्णी काढली तरच ती काढता येईल. तशा मशीन वाढवण्याच्या सूचना आम्ही संबंधित ठेकेदारास दिल्या आहेत.
मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, पुणे मनपा