Shiv Jayanti | शिवजयंती दिवशी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिकेत हजर राहणे अनिवार्य

HomeपुणेBreaking News

Shiv Jayanti | शिवजयंती दिवशी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिकेत हजर राहणे अनिवार्य

Ganesh Kumar Mule Feb 17, 2023 6:04 AM

CHS Portal | PMC Health Service | CHS पोर्टल वर माहिती नाही भरली कर्मचाऱ्यांना पत्र दिले जाणार नाही | अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचा कर्मचाऱ्यांना इशारा
Pune Municipal Corporation Employees | अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाला महापालिका आयुक्त कार्यालयाकडूनच हरताळ! 
Divyang Employees | PMC Pune | दिव्यांग कर्मचारी आणि नागरिकांशी सलोख्याने वागा | अन्यथा कर्मचाऱ्यांवर होणार प्रशासकीय कार्यवाही 

शिवजयंती दिवशी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिकेत हजर राहणे अनिवार्य

| अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचे आदेश

पुणे |  श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्यगीत अंगीकृत करणेबाबत नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यगीताचे गायन करणे क्रमप्राप्त आहे. यास्तव सुट्टी असली तरी महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महापालिका भवनात हजर राहणे अनिवार्य आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pmc Pune)
आदेशानुसार हा  कार्यक्रम रविवार १९/०२/२०२३ रोजी सकाळी ९:१५ वा. (नऊ वाजून पंधरा मिनिटे) मनपा भवन, हिरवळ येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर दिवशी शासकीय सुट्टी असली तरीही ह्या कार्यक्रमासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी व वेळी न चुकता हजर राहावयाचे आहे. तसेच सदर दिवशी पुणे शहरात दुपारी ४.००
वाजेपासून श्री भवानी माता मंदिरापासून ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, एसएसपीएमएस, शिवाजीनगर, पुणे पर्यंत मिरवणूकीचे आयोजन करणेत आलेले असून सदर मिरवणूकीस सर्व अधिकारी व
कर्मचारी यांनी उपस्थित रहावे. तरी, सर्व संबंधितांची सदर कार्यक्रमाचे अगोदर किमान १० मिनिटे मनपा भवन, हिरवळ येथे उपस्थित रहावे. असे आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)