मातृभाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य” | प्रा.डॉ.वसंत गावडे
मराठी भाषेचा प्रचार,प्रसार व संवर्धन करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. मराठीला माहिती तंत्रज्ञानाकडे वळवा. भाषा म्हणजे आपली ओळख, मान,सन्मान आहे. असे प्रतिपादन डॉ वसंत गावडे यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर, ता-जुन्नर, जि-पुणे येथे,सोमवार दि. २७ फेब्रुवारी २०२३ रोजी *मराठी भाषा गौरव दिन* मोठ्या आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. तसेच महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले.त्यानिमित्ताने महाविद्यालयात मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मराठी भाषा स्वाक्षरी मोहीम *काव्यवाचन ,*तसेच प्रा. डॉ.वसंत गावडे यांचे “मायबोली मराठी”या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ते आपल्या व्याख्यानात म्हणाले,”मराठी भाषेचा प्रचार,प्रसार व संवर्धन करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. मराठीला माहिती तंत्रज्ञानाकडे वळवा. भाषा म्हणजे आपली ओळख, मान,सन्मान आहे. मराठी भाषेचे व्यक्तित्व अनेक पदरी आहे. मराठीचा इतिहास केवळ अभिजात असण्यापेक्षाही कितीतरी भव्य दिव्य आहे भाषा हा संस्कृतीच्या हस्तांतरणाचा मार्ग आहे. मराठी ज्ञानभाषा म्हणून सक्षम होते आहे. मराठी भाषा अधिकाधिक सशक्त, समृद्ध, आणि सर्वसामान्य करायचा निर्धार आपण करूया.”
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांनी भूषविले, ते आपल्या मनोगत म्हणाले,”कुठलीही भाषा जितकी वापरत राहील तितकी ती अधिक बहरते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्थानिक भाषेला मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम म्हणून महत्त्व प्राप्त झाले.”सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.एफ.ढाकणे, उपप्राचार्य डॉ.व्ही.एम शिंदे, डॉ. के.डी.सोनवणे,डॉ. सुनील लंगडे,डॉ. दत्तात्रय टिळेकर, डॉ संतोष वाळके, डॉ.निलेश काळे,डॉ.रमाकांत कस्पटे, डॉ. छाया तांबे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. सूत्रसंचालन डॉ.अमोल बिबे यांनी केले.प्रा.रोहिणी मदने यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.