Water use Charges | पाटबंधारे महापालिकेकडून दुप्पट दराने पाणीपट्टी घेणार  | पाटबंधारेचे महापालिकेला पत्र 

HomeBreaking Newsपुणे

Water use Charges | पाटबंधारे महापालिकेकडून दुप्पट दराने पाणीपट्टी घेणार  | पाटबंधारेचे महापालिकेला पत्र 

Ganesh Kumar Mule Jul 10, 2022 11:17 AM

Lord Shri Rama Statue | हडपसरमध्ये साकारणार 9 फूट उंचीचा प्रभू श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा 
PMC Bogus Identity Card | पुणे महापालिकेत बोगस ओळखपत्र धारकांचा सुळसुळाट | सुरक्षा विभागाने जप्त केली 175 बोगस ओळखपत्र 
Biometric Attendance | PMC Pune | कर्मचाऱ्यांना शिस्त पाळायचीय ; मात्र प्रशासनालाच सुधरायचं नाही 

पाटबंधारे महापालिकेकडून दुप्पट दराने पाणीपट्टी घेणार

| पाटबंधारेचे महापालिकेला पत्र

पुणे |  महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महाराष्ट्रातील कृषी सिंचन, घरगुती व औद्योगिक प्रयोजनार्थ वापरल्या जाणाऱ्या पाण्यासाठीचे ठोक जलप्रशुल्क (पाणीपट्टी) चे सुधारित दर दि. २९.०३.२०२२ चे आदेशान्वये निर्गमित केले आहेत. या आदेशान्वये निर्धारित केलेले दर जलवर्ष १ जुलै २०२२ पासून पुढील ३ वर्षासाठी लागू राहतील. या आदेशातील तरतूदींना अनुसरून महापालिकेला ज्यादा पाणी वापराच्या बदल्यात दुप्पट दराने पाणी पट्टी द्यावी लागणार आहे. तसे पत्र पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेस दिले आहे.

पाटबंधारे विभागाच्या पत्रानुसार पुणे महानगरपालिका जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पातून सद्यस्थितीत सरासरी दैनंदिन 1742 MLD  पाणीवापर करीत आहे. पुणे महानगरपालिकेस सन २०२१-२२ च्या वार्षिक पाण्याच्या अंदाजपत्रकासाठी ११.८३५ टीएमसी Bulk Water Entitlement मंजूर करण्यात आलेला आहे. तथापि वरील पाणीवापरानुसार पुणे म.न.पा. सरासरी एकूण १७४२ MLD पाणीवापर करीत असून तो वार्षिक २२.४५ TMC इतका येत आहे. पुणे म.न.पा. मोठ्या प्रमाणात अनुज्ञेय पाणीवापरापेक्षा जास्तीचा पाणीवापर करीत आहे. म.न.पा.चा काही पाणीवापर (पुणे म.न.पा. हद्दीत समाविष्ट ग्रामपंचायतींचा) कालव्यातूनही मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच
पुणे म.न.पा.स सन २०२१-२२ च्या मंजूर वार्षिक पाण्याच्या अंदाजपत्रकात १.३९ TMC इतका औद्योगिक पाणीवापर अनुज्ञेय आहे. तथापि पुणे म.न.पा. एकूण अनुज्ञेय ११.८३५ TMC पाणी वापरापेक्षा जास्त म्हणजेच एकूण २२.४५ TMC पाणीवापर करीत आहे.
पुणे म.न.पा.ने सन २०२२-२३ चे वार्षिक पाण्याचे अंदाजपत्रक अद्याप सादर केलेले नाही. तथापि पुणे म.न.पा.स सन २०२२-२३ मध्ये वार्षिक पाण्याच्या अंदाजपत्रकानुसार अनुज्ञेय पाणी वापरापेक्षा जास्तीच्या पाणीवापरास मूळ औद्योगिक पाणीवापराच्या प्रमाणात औद्योगिक दराने सुधारित दरानुसार पाणीपट्टी आकारणी दर लागू राहतील.

पत्रात पुढे म्हटले आहे कि, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचे आदेश मध्ये पाणीवापरानुसार पाणीपट्टी आकारणीचे दर दिलेले आहेत. याअनुषंगाने पुणे महानगरपालिकेस बिगरसिंचन पाणीवापरापोटी सन २०२२-२३ च्या वार्षिक अंदाजपत्रकानुसार अनुज्ञेय केलेल्या
पाणीवापरावरील परिमाणास याच  दराने आकारणी करणे अपेक्षित आहे.

पुणे महानगरपालिका जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पातून सद्यस्थितीत सरासरी दैनंदिन १७४२ MLD (२२.४५ TMC) पाणीवापर करीत आहे. पुणे महानगरपालिकेच्या दैनंदिन १७४२ MLD पाणी वापराच्या ८०% परिमाणाप्रमाणे सांडपाणी (१३९४ MLD) निर्माण होते.

पुणे महानगरपालिकेने ६.५० टीएमसी सांडपाणी प्रक्रिया करून सिंचनासाठी कालव्यामध्ये उपलब्ध करुन देणे बंधनकारक केले आहे. तथापि पुणे महानगरपालिका पूर्ण सांडपाण्यावर आवश्यक गुणवत्तेपर्यंत प्रक्रिया करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे म.ज.नि.प्रा. चे आदेश दि. २९.०३.२०२२ मधील निर्देशांनुसार पुणे महानगरपालिका सांडपाण्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विहीत मानकानुसार प्रक्रिया करीत नसल्याने मानक दराच्या दुप्पट दराने आकारणी दर लागू राहतील.