महापालिकेच्या विद्युत विभागाकडून टेंडरबाबत नियमबाह्य काम
: महापालिका आयुक्तांनी दिले हे ‘सक्त’ आदेश
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून विद्युत विषयक विविध विकास कामे, देखभाल दुरूस्ती ची कामे, भांडवली कामे केली जातात. मात्र निदर्शनास असे दिसून आले आहे की संबधित कामांना मान्य झालेल्या तरतुदीचे विभाजन करून जाहिरात, टेंडर इत्यादी देण्यात येतात. ही बाब नियमबाहय आहे. यापुढे विविध कामांच्या तरतुदीचे विभाजन करून जाहिरात, टेंडर इत्यादी देण्यात येऊ नये. असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. शिवाय क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कुठली कामे करावीत आणि कुठली करू नयेत, याबाबत देखील कार्यपद्धती ठरवून देण्यात आली आहे.
: आयुक्तांचे असे आहेत आदेश
पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून विद्युत विषयक विविध विकास कामे, देखभाल दुरूस्ती ची कामे, भांडवली कामे केली जातात. आमच्या निदर्शनास असे दिसून आले आहे की संबधित कामांना मान्य झालेल्या तरतुदीचे विभाजन करून जाहिरात, टेंडर इत्यादी देण्यात येतात. ही बाब नियमबाहय आहे. यापुढे विविध कामांच्या तरतुदीचे विभाजन करून जाहिरात, टेंडर इत्यादी देण्यात येऊ नये याबाबत मुख्य अभियंता विद्युत यांनी त्यांचेकडील संबंधित अधिकारी/ सेवक यांना अवगत करावे. मुख्य लेखा व वित्त विभाग, पुणे महानगरपालिका यांचे जा.क्र ४४४ दिनांक ११/०५/२०२१ अन्वये यापूर्वीच याबाबत सर्वांना अवगत करण्यात आले आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. विद्युत विभागाकडील सर्व अभियंता यांना या कार्यालयीन आदेशाद्वारे आदेशित करण्यात येते की रक्कम रू. दहा लक्ष पर्यंतचे स्ट्रीट लाईट पोलचे दिवे देखभाल दुरूस्तीची कामे तसेच भवनांचे विद्युत विषयक देखभाल दुरूस्ती चे कामे क्षेत्रिय कार्यालयाचे स्तरावर करण्यात यावे.
प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी सर्व प्रकल्पीय कामे उदा. भूमीगत केबल चे कामे स्मशानभूमीकडील कामे, सीसीटीव्ही विषयक कामे, हॉस्पिटल, लिफ्ट, सांस्कृतिक भवानांचे विद्युत विषयक कामे डेकोरेटिव्ह पोलची कामे क्षेत्रिय कार्यालयाचे स्तरावर न करता मुख्य अभियंता कार्यालयामार्फत मुख्य अभियंता विद्युत यांचे मार्गदर्शन व नियंत्रणाखाली करण्यात यावीत. तरी सर्व विद्युत अभियंता यांनी उपरोक्त आदेशाची त्वरीत अंमलबजावणी करावी.
COMMENTS