Indian Swachhata League | PMC Solid Waste Management | स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० उपक्रमांतर्गत पुणे महापालिकेकडून “मेगा ड्राईव्ह” चे आयोजन
| 6774 नागरिकांचा सहभाग | ७०१५ किलो सुका कचरा व २१०३ किलो ओला कचरा संकलित
Indian Swachhata League | PMC Solid Waste Management | स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० (Swatch Bharat Mission Urban 2.0) उपक्रमांतर्गत भारत सरकारच्या MOHUA (गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय) द्वारे आयोजत इंडियन स्वच्छता लीग मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. “Indian Swachhata League” अंतर्गत “पुणेरी नायक” या नावाने पुणे शहर सहभागी झाले असून 17 सप्टेंबर (सेवा दिवस) ते 2 ऑक्टोबर (गांधी जयंती व स्वच्छता दिवस) या कालावधीत नागरिकांच्या व विशेषता युवा वर्गाच्या सहभागातून पुणे शहरात पुणे महानगरपालिके (Pune Municipal Corporation) मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आज संपूर्ण शहरभर मेगा ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले. अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम (Deputy commissioner Sandeep Kadam) यांनी दिली. (Indian Swachhata League | PMC Solid Waste Management)
नानासाहेब पेशवे तलाव व शहरात इतर ठिकाणी नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये शनिवारवाडा, कात्रज तलाव या ठिकाणी रॅलीस, स्वच्छता मोहीम, प्लॉगेथोन या मध्ये पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्था, शाळा / महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. दिनांक १५ सप्टेंबर पासून सुरु होणा-या आणि २ ऑक्टोबर (राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि स्वच्छता दिवस) या कालावधीत राबविण्यात येणा-या मोहिमेमध्ये विविध शहरस्तरीय उपक्रमांचा समावेश असून कचरामुक्त शहर (मेरा शहर कुडे से आझाद शहर) या संकल्पनेसाठी संयुक्त कृती आणि वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करणे हा या मोहिमेचा व्यापक उद्देश आहे.मोहिमेचा एक भाग म्हणून विविध पार्श्वभूमीतील MMCC कॉलेज, SNDT कॉलेज, BMCC
कॉलेज, गोखले इन्स्टिट्यूट, हुजूरपागा शाळा, HV देसाई, SP कॉलेज, मॉडर्न कॉलेज, मामासाहेब मोहोळ
कॉलेज, सिंहगड कॉलेज, कॅम्ब्रीज शाळा, कमिन्स कॉलेज, कर्वे इन्स्टिट्यूट, GSMAC शाळा, Asian कॉलेज इत्यादी शैक्षणिक संस्था, व स्वच्छ संस्था, जनवाणी जीवित नदी Worship earth foundation, Wepunekars foundation, कमिन्स इंडिया, हर्षदीप फाउंडेशन, स्वच्छ पुणे सहकारी संस्था, सेवा सहयोग सह. संस्था, थंब फ्रीएटिव्ह इत्यादी स्वयंसेवी संस्था सहभागी होण्यासाठी १७ सप्टेंबर, २०२३ रोजी युवकाचा पुढाकार असलेली देशव्यापी ‘भारतीय स्वच्छता लीग मोहीमचे आयोजन करण्यात आले होते.

या मोहिमे मध्ये पुणे महानगरपालिका पुणेरी नायक संघ सहभागी असून आपले संघनायक डॉ. सलील कुलकर्णी
(ब्रॅन्ड अॅम्बेसिडर पुणे महानगरपालिका) सुप्रसिद्ध गायक संगीतकार गीतकार, लेखक, दिग्दर्शक आहेत. श्री.
विक्रम कुमार, मा. महापालिका आयुक्त श्री. डॉ. कुणाल खेमनार, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ). श्री. संदीप कदम, मा. उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन, श्री. सत्या नटराजन, ब्रॅन्ड अॅम्बेसिडर, श्रीमती, आम्रपाली चव्हाण, ब्रॅन्ड अॅम्बेसिडर, महापालिका सहाय्यक आयुक्त व अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.

त्याचबरोबर १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत अंदाजे ३० ठिकाणी जनजागृती मोहीम, फ्लॅश मॉब व रॅलीज अशा विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यामध्ये शहरातील माजी मा.सभासद व पदाधिकारी, पुणे शहरातील विविध शाळा/ महाविद्यालये, NSS, NCC, खाजगी संस्था, विविध स्वयं सेवी संस्था, महिला बचत गट, गणेश मंडळे, मोहल्ला कमिटी सदस्य व कार्यक्षेत्रातील विविध मान्यवर, प्रतिष्ठित व्यक्ती एकूण अंदाजे ६७७४ नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला व सर्व ठिकाणाच्या स्वच्छता मोहिमांतर्गत एकूण ७०१५ किलो सुका कचरा व २१०३ किलो ओला कचरा संकलित करून पुनः चक्रीकरण करण्यासाठी
पाठविण्यात आला.
पाठविण्यात आला.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यानामध्ये ई कचऱ्यापासून बनविलेल्या कलाकृतींचे लोकार्पण घनकचरा विभागाचे प्रमुख श्री. संदीप कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी
महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे, महापालिका सहाय्यक आयुक्त श्री.केदार वाले वरिष्ट आरोग्य निरीक्षक श्री राम सोनावणे तसेच कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या श्रीमती अवंती कदम, श्री. संपत खैरे, जनवाणीचे श्री. मंगेश क्षीरसागर, श्री. समीर अजगेकर, श्रीमती ज्योती सातव उपस्थित होत्या. ई कचऱ्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्याचे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे काळाची गरज बनली आहे. कमिन्स इंडिया फाउंडेशन मागील १० वर्षांपासून जनवाणी आणि पूर्णम वा सामाजिक संस्थांच्या मध्यातून पुणे शहरात जनजागृती करत आहे. शहरातील नागरिकांना ई- कचऱ्याचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. या कलाकृती टाकाऊ इलेक्रोनिक बोर्ड, वायर, पाईप यापासून बनविण्यात आल्या आहेत, ई कचऱ्याचा वापर करून उद्यानाच्या परिसरात रोषणाई करण्यात आली आहे. अश्याप्रकरे टाकाऊ वस्तूंचा पूनरवापर करणे शक्य आहे. परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या सुंदर कलाकृती श्री. गिरीश धामणे यांनी साकारल्या आहेत. यासाठी कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि जनवाणी संस्थेने पुढाकार घेतला.

या वर्षी पुणे महापालिकेने सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्धी, त्याविषयी माहिती व अभिप्राय या समस्या सोडवण्याच्या दृष्टीकोनातून एक पाऊल पुढे टाकले आहे. जून महिन्यामध्ये पुणे महापालिकेने
टॉयलेटसेवा (ToiletSeva) सोबत सेवा पार्टनरशिप घोषित केली आहे. पुणे महापालिकेने पुणे शहरामधील ११८३ सार्वजनिक स्वच्छतागृहांची (public टॉयलेट्स community टॉयलेट्स) माहिती टॉयलेटसेवा (ToiletSeva) अॅप मध्ये उपलब्ध करून दिली आहे. टॉयलेटसेवा अॅप मध्ये पुणे शहरामधील कुठलाही पत्ता टाकून पुणे महापालिकेची सार्वजनिक स्वच्छतागृहे शोधता येतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणे शहरामधील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये QR Code स्टिकर्स लावले जात आहेत. ते QR Code
टॉयलेटसेवा अॅप मध्ये स्कॅन करून नागरिकांना तात्काळ अभिप्राय देता येईल. ह्या विषयावर जागृती करण्यासाठी आणि हा नावीन्यपूर्ण उपक्रम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गणेशोत्सव मंडळांची सामाजिक कार्यकत्यांची समाज माध्यमांची आणि सजग नागरिकांची मदत अपेक्षित आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांविषयीचा आपला अभिप्राय टॉयलेटसेवा अॅप मधून रेटिंग्स च्या मार्फत आणि समस्या (issues) रिपोर्ट करून कळवाव्यात असे आवाहन पुणे महापालिका करत आहे. स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे हा स्वच्छ भारत अभियानाचा महत्वाचा भाग आहेत. म्हणूनच सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये QR Code स्टिकर्स लावण्याच्या उपक्रमाचे उदघाटन दि. १७ सप्टेंबर ह्या सेवा दिवशी उपायुक्त, श्री. संदीप कदम, घनकचरा व्यवस्थापन विभाग यांचे उपस्थितीत कोथरूड मधील लक्ष्मीनगर येथील ँ सामूहिक स्वच्छतागृहात झाले. टॉयलेटसेवा अॅप मध्ये असे QR Code स्टिकर स्कॅन करून वापरकर्त्यांना त्या टॉयलेट साठीचा अभिप्राय लगेच देता येईल. पुणे महापालिका टॉयलेटसेवा अॅप कडून मिळणाऱ्या अभिप्रायावरती कृती करण्यासाठी कटिबद्ध आहे. ह्या कार्यक्रमासाठी डॉ. केतकी घाटगे ( सहा आरोग्य अधिकारी), श्री. केदार बझे (महापालिका सहाय्यक आयुक्त ) श्री. प्रीतम आणि श्रीमती सोनाली चोपडा
(टॉयलेटसेवा पुणे डायरेक्टर्स) आणि पुणे महापालिकेमधील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.