Indian Army | अग्निवीर निवड चाचणीसाठी १० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
Agniveer – (The Karbhari News Service) – पुणे जिल्ह्यातील अधिवास असणाऱ्या अविवाहीत पुरुष उमेदवारांनी अग्निपथ योजनेअंतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी अग्निवीर प्रवेशासाठी निवड चाचणीसाठी १० एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेशासाठी https://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सामान्य प्रवेश परीक्षा जून २०२५ मध्ये आयोजित केली केली जाईत. तथापि, परीक्षेची निश्चित तारीख संकेतस्थळावर दर्शविण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट देत रहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी कळविले आहे.
COMMENTS