Independence Day | पुणे महानगरपालिकेत भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले

Homeadministrative

Independence Day | पुणे महानगरपालिकेत भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Ganesh Kumar Mule Aug 15, 2024 7:42 PM

PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना रात्रीची ड्युटी 31 ऑगस्ट पर्यंत करावी लागणार | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचे आदेश
Dr. Rajendra Bhosle IAS is the new commissioner of Pune Municipal Corporation | Transfer of Vikram Kumar IAS 
Pune Rain | महापालिका प्रशासनाने बाधित कुटुंबांचे पंचनामे लवकर करून त्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी | डॉ. नीलम गोऱ्हे

Independence Day | पुणे महानगरपालिकेत भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 

Pune Municipal Corporation – (The karbhari News Service) – भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापन दिन पुणे महानगरपालिकेत उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्यास पुष्प अर्पण केली. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण केली. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच सकाळी ८.१५ वाजता मा. प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. (Pune PMC News)

त्यानंतर राष्ट्रीय मतदार दिवस मतदारांसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच या प्रसंगी घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा.महापालिका आयुक्त यांनी सायकल रॅली ला फ्लॅग ऑफ करून सुरुवात करून दिली.

याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) पृथ्वीराज बी. पी. तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0