पहिल्या टप्प्यात 50 रस्त्यांवर दुरुस्तीची कामे केली जाणार
| 140 ठिकाणाची केली जाणार डागडुजी
पुणे |. यंदा पावसाचा जोर जास्त दिवस राहिल्याने डागडुजी केलेले रस्ते नंतर खराब झाले होते. याबाबत महापालिकेच्या पथ विभागाने आता गंभीरपणे पाऊल उचलले आहे. महापालिका आता शहरभरातील दुरुस्त केलेले रस्ते सोडुन सर्व रस्ते दुरुस्त करणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच इस्टिमेट कमिटीने मान्यता दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 50 रस्त्यांची निवड करण्यात आली असून त्यावरील 140 ठिकाणची दुरुस्ती केली जाणार आहे. त्याबाबत पथ विभागाकडून लवकरच टेंडर प्रक्रिया केली जाणार आहे. याबाबतची पथ विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी महापालिकेला 194 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अशी माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.
पुणे शहरात रस्त्यांचे जाळे पसरले आहे. मात्र पावसाळ्याच्या दिवसात हे रस्ते खराब होतात. महापालिकेकडून याची तात्काळ दुरुस्ती केली जाते. यंदा मात्र रस्त्यांची अवस्था चांगलीच खराब झाली होती. कारण अतिरिक्त पावसाने डागडुजी केलेले रस्ते नंतर खराब झाले. याबाबत शहरातील नागरिकांकडून ओरड होत होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता याबाबत गंभीरपणे पाऊल उचलले आहे. महापालिका आता शहरातील सर्व रस्ते दुरुस्त करणार आहे. याबाबत पथ विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव देखील महापालिका प्रशासनाकडून इस्टिमेट कमिटीसमोर ठेवण्यात आला होता. त्याला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.
याबाबत साहेबराव दांडगे यांनी सांगितले कि पहिल्या टप्यात 50 रस्त्यांवरील कामे हाती घेण्यात येतील. त्यावरील 140 ठिकाणावर दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. जवळपास 150 किमीचे हे रस्ते आहेत. हे काम करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्याचे काम सुरु आहे. 3 पॅकेज मध्ये प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी 194 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दांडगे पुढे म्हणाले, ही कामे सिमेंट, utwt आणि डांबरी अशा पद्धतीने केली जातील. डांबरी रस्त्याच्या कामासाठी 6 महिन्याची मुदत असेल तर सिमेंट रस्त्यासाठी 12 महिन्याची मुदत असेल. टेंडर प्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल, असे ही दांडगे म्हणाले.