भाजपाची मते ४१ हजारांवरून ७८ हजारांपर्यंत वाढली
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात जनतेचा कौल मान्य
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची मते ४१ हजारांवरून वाढून ७८ हजार झाली असून जनाधार वाढविण्यासाठी अधिक काय करावे याचा विचार पक्ष करेल, असे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, काँग्रेसच्या विजयी उमेदवार जयश्री जाधव यांचे आपण अभिनंदन करतो. सत्ताधारी महाविकास आघाडीचे तीन पक्ष विरुद्ध एकटा भाजपा अशी अटीतटीची निवडणूक झाली. परंतु, काँग्रेसच्या उमेदवाराचे मताधिक्य जास्त नाही. त्यामुळे कोणी हुरळून जाऊ नये. या निवडणुकीत भाजपाची मते वाढली आहेत आणि निवडणुकीच्या निमित्ताने गल्लोगल्ली चांगले कार्यकर्ते उभे राहिले आहेत.
त्यांनी सांगितले की, राज्यात भाजपाचे सरकार नाही. भाजपाच्या विरोधात दडपशाही, दंडुकेशाही, पैसा व जातीच्या कार्डचा वापर करण्यात आला. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांच्या अंगावर धाऊन जाण्यापर्यंत दडपशाही झाली. तथापि, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही दडपशाहीला न घाबरता काम केले. भाजपाची मते ४१ हजारांवरून ७८ हजारांपर्यंत वाढली. ही फार मोठी प्रगती आहे.
ते म्हणाले की, भाजपाने ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढली. हिंदुत्व हा काही भाजपाचा निवडणुकीचा अथवा राजकारणाचा मुद्दा नाही तर हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे. आम्ही आमची हिंदुत्वाची भूमिका कधीच लपवली नाही.
COMMENTS
राजकारण हा नालायक पणाचा कळस झालेला असून त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही कोल्हापूरची झालेली पोटनिवडणूक होय.
भाजपाने धर्मांध राजकारण न करता जातीवादी चे मुद्दे न काढता विकासाच्या मुद्द्यावर ती निवडणुका लढवल्या तर ते योग्य राहील. भाजपाचे काळात 2014 ते अद्यापपर्यंत राज्यामध्ये नवीन उद्योग नाही किंवा नवीन अर्थव्यवस्था किंवा नवीन कोणतेही काम भाजपने केलेलं प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ही दिसतं नाही.
देशभरात झालेल्या उठ निवडणुकांमध्ये भाजपाचा सुपडा साफ झालेला असून पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या उमेदवारांना साडेतीन हजार मतं मिळावीत यापेक्षा दुर्दैवं ते काय.?
भाजपाचे मोदी सरकारने अतिप्रचंड घरगुती गॅस दरवाढ दुपटीने तिपटीने डिझेल व पेट्रोलच्या दरवाढ यामुळे राज्यातील व देशातील जनता प्रचंड संतप्त झालेली आहे. ” इंधन दरवाढीची जी वाढती सीडी आहे, उडी,, पेक्षा भयंकर आहे,, .
भाजपाकडून हे असेच प्रकार होत राहिले तर पुढे जाऊन भाजपा हा राज्यात सुपडासाफ होण्याला वेळ लागणार नाही त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे.
भाजप आणि प्रदेशाध्यक्ष हातात काय बदलावा आणि प्रदेशाध्यक्ष हा रावसाहेब दानवे यांसारखा कार्य सम्राट कार्यकर्ता असावा. डॉक्टर गिरीश महाजन हे प्रदेशाध्यक्ष होऊ शकत नाहीत कारण त्यांच्यामध्ये ती क्षमता नाही दुसर्याच्या ओंजळीने पाणी पिणारा नेता किंवा चंद्रकांत पाटलांचा रखा गर्विष्ट नेता हा भाजपाला रसातळाला घेऊन जाईल यात शंका नाही.
भाजपाचे भारतीय टीमने महाराष्ट्रातील तीन नेते थोडक्यात जे तीर कुट ( फडणवीस+चंद्रकांत पाटील+गिरीष महाजन.) आहे ते तातडीने बदलावे. भाजीपाला कधी वर येऊ देणार नाही असे राजकीय गणित आणि मत आहे.
विश्लेषक विठ्ठल पवार राजे.
राजकारण हा नालायक पणाचा कळस झालेला असून त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही कोल्हापूरची झालेली पोटनिवडणूक होय.
भाजपाने धर्मांध राजकारण न करता जातीवादी चे मुद्दे न काढता विकासाच्या मुद्द्यावर ती निवडणुका लढवल्या तर ते योग्य राहील. भाजपाचे काळात 2014 ते अद्यापपर्यंत राज्यामध्ये नवीन उद्योग नाही किंवा नवीन अर्थव्यवस्था किंवा नवीन कोणतेही काम भाजपने केलेलं प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ही दिसतं नाही.
देशभरात झालेल्या पोट निवडणुकांमध्ये भाजपाचा सुपडा साफ झालेला असून पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या उमेदवारांना साडेतीन हजार मतं मिळावीत यापेक्षा दुर्दैवं ते काय.?
भाजपाचे मोदी सरकारने अतिप्रचंड घरगुती गॅस दरवाढ दुपटीने तिपटीने डिझेल व पेट्रोलच्या दरवाढ यामुळे राज्यातील व देशातील जनता प्रचंड संतप्त झालेली आहे. ” इंधन दरवाढीची जी वाढती सीडी आहे, ईडी,, पेक्षा भयंकर आहे,, .