Maheshwari community :  parisar Mahesh Mandal : माहेश्वरी समाजाचे शैक्षणिक क्षेत्रात महत्वाचे योगदान – महापौर माई ढोरे यांचे प्रतिपादन 

HomeपुणेPolitical

Maheshwari community : parisar Mahesh Mandal : माहेश्वरी समाजाचे शैक्षणिक क्षेत्रात महत्वाचे योगदान – महापौर माई ढोरे यांचे प्रतिपादन 

Ganesh Kumar Mule Dec 19, 2021 12:49 PM

RTE Admission | आरटीई अंतर्गत राखीव जागांसाठी अर्ज करण्याचे पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाचे आवाहन!
7 Principles of Investing | गुंतवणुकीची (Investment) 7 तत्त्वे जी तुम्ही आजपासून वापरण्यास सुरुवात करा
How to building wealth? | Everything you need to know about building wealth

माहेश्वरी समाजाचे शैक्षणिक क्षेत्रात महत्वाचे योगदान

– महापौर माई ढोरे यांचे प्रतिपादन

पिंपरी :   शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी … ग्रंथ हेच गुरु … शिकाल तर जगाल,  हे उद्दिष्ट ठेवून सांगवी परिसर महेश मंडळाच्या वतीने नवी सांगवी येथील जनता शिक्षण संस्थेच्या नवीन मराठी शाळेला ८ संगणक व्हेरिटास टेकनॉलॉजी पुणे यांच्या सहकार्याने भेट देऊन संगणक वर्ग चालू करण्यात आला. माहेश्वरी समाजाचे शेक्षणिक क्षेत्रात महत्वाचे योगदान आहे. याचे सांगवी परिसर महेश मंडळ उदाहरण आहे असे प्रतिपादन महापौर माई ढोरे यांनी कै चंपालालजी गुगळे यांच्या स्मरणार्थ माहेश्वरी संगणक कक्षाच्या उदघाटन प्रसंगी केले.

: शाळेला संगणकाची भेट

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित संगणक शिक्षण सहज उपलबध होते . मात्र , मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेच्या तुलनेत संगणक साहित्याची कमतरता भासत असते. ठीक ठिकाणी इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी चढाओढ चालू असते . इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्याच्या तुलनेत मराठी शाळेतील विद्यार्थी या तांत्रिक युगात टिकून राहण्यासाठी देण्यात आले.  माहेश्वरी समाजाचे शेक्षणिक क्षेत्रात महत्वाचे योगदान आहे. याचे सांगवी परिसर महेश मंडळ उदाहरण आहे असे प्रतिपादन महापौर माई ढोरे यांनी कै चंपालालजी गुगळे यांच्या स्मरणार्थ माहेश्वरी संगणक कक्षाच्या उदघाटन प्रसंगी केले.

मागील एक वर्षांपासून विद्यार्थी सर्व शिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेत आहेत, परंतु संस्थेकडे संगणक नसल्यामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या.  या संगणकांमुळे बऱ्याच अंशी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत च्या अडचणी सुटतील असे मत मुख्याधिपिका सौ सुनीता माळवदे यांनी मांडले.

या प्रसंगी नगरसेविका शारदा सोनवणे, मंडळाचे अध्यक्ष सतीश लोहिया, संदीप गुगळे, जनता शिक्षण संस्थेचे सचिव हेमंत बनगर, रामेश्वर होनखांब, दीपेश मालानी आदी मंडळाचे सभासद उपस्थित होते

प्रास्तविक मनोज अटल यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील दरेकर यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0