Nana Bhangire | 7 ते 10 वर्ष एकाच ठिकाणी काम करणाऱ्या SI, DI च्या बदल्या तात्काळ करा   | शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांची पुन्हा आक्रमक भूमिका

HomeपुणेBreaking News

Nana Bhangire | 7 ते 10 वर्ष एकाच ठिकाणी काम करणाऱ्या SI, DI च्या बदल्या तात्काळ करा | शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांची पुन्हा आक्रमक भूमिका

Ganesh Kumar Mule Apr 18, 2023 3:45 PM

Good News For PMPML Employees | पीएमपी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू | डिसेंबर च्या वेतनात फरकाची ५०% रक्कम जमा केली जाणार
Shivsena | पुणे शहर शिवसेना सदैव नागरिकांच्या सेवेत |शहर संपर्क प्रमुख अजय बापू भोसले आणि शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिला विश्वास
MLC | Pune News | विधान परिषदेवर आमदार म्हणून नाना भानगिरेंना मिळणार संधी!

7 ते 10 वर्ष एकाच ठिकाणी काम करणाऱ्या SI, DI च्या बदल्या तात्काळ करा

| शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांची पुन्हा आक्रमक भूमिका

पुणे | पुणे महापालिकेत कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रलंबित होत्या. याबाबत शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी पुढाकार घेत प्रशासनाला इशारा दिला होता. त्यानुसार प्रशासनाकडून 20% बदल्या केल्या आहेत. मात्र 10 वर्ष एकाच ठिकाणी काम करणारे अजून काही कर्मचारी तसेच आहेत. याबाबत भानगिरे यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. 10 वर्ष एकाच ठिकाणी काम करणारे खासकरून SI आणि DI च्या तात्काळ बदल्या करण्याची मागणी भानगिरे यांनी केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून नुकत्याच काही बदल्या करण्यात आल्या आहेत. जवळपास सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदलाचा यात समावेश आहे. मात्र या बदल्या 20% च केल्या आहेत. त्यामुळे अजूनही काही कर्मचारी असे आहेत ज्यांची एकाच खात्यात 7 ते 10 वर्ष सेवा झाली आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे आवश्यक आहे.

याबाबत नाना भानगिरे यांनी सांगितले कि, 2012 नंतर बदल्या झाल्या. परंतु ज्या कर्मचाऱ्यांचा वशिला नाही अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. कर आकारणी कर संकलन विभागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचा आढावा घेतल्यास सन 2010 पासून तेच तेच अधिकारी त्याच त्याच परिसरात काम करीत आहेत. परिणामी अशा अधिकाऱ्यांची त्या त्या परिसरात मक्तेदारी झालेली आहे.  तसेच हाच प्रकार बदल्या करणारे खाते म्हणजेच घनकचरा विभाग, सामान्य प्रशासन विभाग, मालमत्ता व्यवस्थापन, मुख्य लेखापाल, दक्षता विभाग, आरोग्य विभाग, समाज विकास, कामगार कल्याण विभाग  अशी अत्यंत महत्वाचे विभाग याठिकाणी काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या 7 ते 10 वर्षांहून अधिक काळ झाला तरी झालेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आता केलेल्या बदल्यात देखील या लोकांच्या बदल्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे टॅक्स विभागातील SI, DI तसेच घनकचरा विभागात वर्षानुवर्षे करणाऱ्या SI यांच्या तात्काळ बदल्या कराव्यात. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भानगिरे यांनी दिला आहे.